Akshardhara Book Gallery
Hi Vishwavyapi Valaye Dukhkhachi (ही विश्वव्यापी वलये दुःखाची)
Hi Vishwavyapi Valaye Dukhkhachi (ही विश्वव्यापी वलये दुःखाची)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dinkar Manvar
Publisher: Shabda Publication
Pages: 207
Edition: Latest
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
Hi Vishwavyapi Valaye Dukhkhachi (ही विश्वव्यापी वलये दुःखाची)
। लिहिण्यानं वा बोलण्यानं कवीचं अस्वस्थ मन पद्मपाणि होत असावं ।
कुणीच सांगू शकत नाही की लिहिण्यानं वा बोलत राहण्यानं काही पडतो का फरक अंगावर संततधार कोसळणाऱ्या दुःखात.
तरीही कवी लिहितोय वा बोलत राहतोय; अशासाठी की लिहिण्यानं वा बोलण्यानं मिळत असावी मुक्ती कैदेत खितपत पडलेल्या हजारो नि:शब्द उच्चारांना.
कवीच्या लिहिण्यानं झाडांना निवांत झोप येते. आटलेल्या नदीतून खळखळ पाणी वाहू लागतं. ढग दाटून येतात पावसाची वाट पाहणाऱ्या दयाळू शेतकऱ्यांच्या कनवाळू डोळ्यांमध्ये.
लिहिण्यानं वा बोलण्यानं डळमळू लागतात मग्रूर सत्ताधीशांची रक्तरंजित पावलं किंवा थरथर कापतात जुलमींचे हिंस्र हात.
लिहिण्यानं वा बोलण्यानं कवीचं अस्वस्थ मन पद्मपाणि होत असावं. कवितेतील ओळींच्या रिकाम्या पोकळीतून उडत राहणारी कितीतरी मोहक फुलपाखरं वाचणाऱ्यांच्या मनात फुलवत असावीत फुलं. कवी यासाठी लिहीत असावा की स्वप्नातील स्वप्निल गुलमोहर स्वप्नातून बाहेर फुलून येऊन रंगांची उधळण करीत राहावा सगळ्या चराचरावर फुलांची.
मीही लिहीत राहतो वा बोलत राहतोय यासाठी की माझ्यातूनही फुलं उमलून सडा पडावा सर्वत्र.
लेखक: दिनकर मनवर
प्रकाशक: शब्द पब्लिकेशन
