Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

How To Control The Uncontrollebal (हाऊ टू कंट्रोल द अनकाँट्रोलेबल )

How To Control The Uncontrollebal (हाऊ टू कंट्रोल द अनकाँट्रोलेबल )

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ben Oldriz

Publisher: MyMirror Publishing House

Pages: 304

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

हाऊ टू कंट्रोल द अनकाँट्रोलेबल 

"आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं." - एपिक्टेटस आयुष्यात कठीण प्रसंग येणारच, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर ? तो मार्ग आहे, स्टोइक तत्त्वज्ञान

 ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणे. स्टोइक तत्त्वज्ञानाचा सुवर्णनियम सांगतो: "आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो."

व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि साहसी व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे दाखवतात की आपण अधिक लवचीक, संतुलित आणि सक्षम जीवन कसं घडवू शकतो. हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे. बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसं की, स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणे जाणूनबुजून थोडा अस्वस्थ अनुभव घेणे निःपक्षपाती दृष्टीकोन विकसित करणे स्वतःच्या मृत्यूचा विचार करणे (मेमेंटो मोरी) "तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल." - मार्कस ऑरेलियस बेन ऑल्ड्रिजबद्दल बेन ऑल्ड्रिज हे व्यावहारिक तत्त्वज्ञान, कम्फर्ट झोन, मानसिक आरोग्य आणि साहस यांवर लेखन करतात. त्यांच्या आव्हानात्मक आणि वेगळ्या प्रयोगांमुळे ते ओळखले जातात.

लेखक : बेन ऑल्ड्रीज  
प्रकाशन : मायमिररर पब्लिशिंग हाऊस 

View full details