Akshardhara Book Gallery
Hoy Hoy Varkari (होय होय वारकरी )
Hoy Hoy Varkari (होय होय वारकरी )
Share
Couldn't load pickup availability
Author: H.Bha.P. Dyaneshavar Bandgar
Publisher: rajgruh prakashan
Pages: 400
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Hoy Hoy Varkari (होय होय वारकरी )
होय होय वारकरी
२०२४ या वर्षात वाचलेलं सर्वाधिक महत्वाचं पुस्तक म्हणून मी ज्ञानेश्वर बंडगर यांच्या 'होय होय वारकरी' या पुस्तकाचा उल्लेख करेन. वारकरी संप्रदायाची चिकित्सा आधुनिक दृष्टीने करताना आपली मूळ परंपरा आणि आजच सांस्कृतिक राजकारण या विषयाची त्यांची निरीक्षणे अभ्यासपूर्ण आहेत. हे पुस्तक आपल्याला आपल्या सांस्कृतिक व्यवहाराकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडत. लेखक स्वतः वारकरी परंपरेशी जन्मान जोडला असल्याने अनेक आपल्या गोष्टी त्याने अनुभवल्या आहेत, हे जाणवून खजील व्हायला होत.ज्ञानेश्वर बंडगर कीर्तन करताना, निरूपणातून आपल्या संत साहित्याच्या वारशाची डोळस चिकित्सा करतात. तुकारामांसारख्या संतांच्या साहित्याचे आपल्या वर्तमानाच्या संधर्भात अर्थनिर्णयन करून पाहतात. वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवतात. अनेक संतांनी नि परंपरापूजक वृत्तीच्या संस्कृतीरक्षकांना साहजिकच हे खटकतं. त्याचा त्यांना त्रासहि सहन करावा लागतो. पण हा तरुण अतिशय ठामपणे, आत्मविश्वासाने आपलं काम करतो आहे, हे त्याच्या पुस्तकातूनही जाणवत राहतं. हे पुस्तक आपल्या वारकरी संप्रदायाच्या आणि संत साहित्याच्या अभ्यासातील एक महत्वाचा दस्तावेज आहे .महाराष्टात एखाद्या विषयाचा चिकीत्सक दृष्टीने अभ्यास करून मांडणी करणारे तरुण आजही आपल्या आसपास आहेत, ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.
लेखक:-ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर
प्रकाशक:राजगृह प्रकाशन
