Akshardhara Book Gallery
Hrud (हृद)
Hrud (हृद)
Couldn't load pickup availability
Author: Tulasi Parab
Share
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 315
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
हृद
तुळसी परब साठोत्तरी पिढीतील अत्यंत महत्त्वाचे कवी आहेत. अनुभवाची दाहकता, प्रचिती आणि दुःखाची स्थाननिश्चिती त्यांची कविता करून देते. त्यांचे 'हिल्लोळ', 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' आणि 'कुबडा नार्सीसस' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी पाब्लो नेरुदांच्या कवितांचे अनुवादही केले आहेत. एका पिढीच्या अस्वस्थ जाणिवांचा समग्रपणे विचार करणारी ही कविता आहे. त्यांच्या कवितेतून ओसंडणारं दुःख तत्कालीन संदर्भअसलेलं अथवा अत्यंत खासगी असलेलं नाही. त्याचा परीघ शेवटच्या माणसापर्यंत विस्तारलेला असतो. त्यातील सामाजिकता थेट समष्टीकडे निर्देश करते. कवितेतून मानवी अस्तित्वाबरोबर भोवतीची गूढ वलयं शोधण्याची उत्कंठा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. दुःखाच्या कार्यकारणभावाचा शोध त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्यातील स्वारस्य प्रतिमांच्या विविधतेतून उलगडण्याचा सोस त्यांना आहे. कोणत्याही शीर्षकाच्या बंदिशीतील आशय त्यांची कविता मांडत नाही तर त्यांच्या अनुभवाचा अवकाश सभोवतालातील समग्रता कवेत घेण्यासाठी उत्सुक असतो. कविता म्हणजे समष्टीसोबत स्वतःचं असणं अशी निरंतर जाणीव ठेवणं होय. अशी मांडणी करतांना आत्मप्रचितीच्या ठोस परिमाणातून त्यांची कविता पुढे येते. 'हृद' हा त्यांच्या आतापर्यंतच्या समग्र जीवनजाणीवेचा प्रवास आहे. ह्या आत्मप्रचितीच्या ठायी अनुभवसिद्ध बुद्धिग्राह्यता जागृत असून, तिच्या विचारप्रवणतेतून मानवी अस्तित्वाचा, गूढत्वाचा अंतिम वेध घेतांना ती दिसून येते. ह्या कवितेला झालेला 'सुफी स्पर्श' अत्यंत महत्त्वाचा वाटतो
लेखक.तुळसी परब
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स
