Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Irawati Karve (इरावती कर्वे)

Irawati Karve (इरावती कर्वे)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shobha Naik

Publisher: Sahitya Akademi

Pages: 130

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भारतीय साहित्याचे निर्माते 

Irawati Karve (इरावती कर्वे)

जागतिक ख्याती प्राप्त मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे (15.12.1905- 11.8.1970) यांनी मराठी साहित्यात ललित लेखन व वैचारिक लेखन या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. मराठी समाज व संस्कृतीच्या अनुषंगाने भारतीय समाज व संस्कृती या विषयावर मूलग्राही संशोधन प्रस्तुत करणाऱ्या विदुषी म्हणून त्यांना ओळखले जाते. ललित साहित्य व रामायण - महाभारत ही महाकाव्ये, तसेच धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, संस्कृती, सामाजिकता, लोकपरंपरा, राज्यकर्त्यांच्या ऐतिहासिक वाटचाली इत्यादी मानव्य विद्याशाखांच्या सखोल व्यासंगातून साहित्य निर्मिती करणारी ही महत्त्वाची लेखिका आहे. देशी व विदेशी अशा अनेक भाषांमध्ये पारंगत असणाऱ्या या विदुषीने आपल्या व्यासंगातून महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वाटचालींचा चेहरा भारतीय संदर्भातून तपासण्याचा सक्षम प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न मराठी संस्कृती व भारतीय संस्कृती यांमधील एकात्मतेची ओळख पटवतो. 'युगान्त' हा त्यांचा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ग्रंथ महाभारतातील निवडक व्यक्तिरेखांचे ऐतिहासिकदृष्ट्या तार्किक विश्लेषण प्रस्तुत करतो. इरावती कर्वे यांच्या अनवट लेखणीचे हा ग्रंथ चिरंतन स्मारक ठरला आहे. त्यांचे साहित्य प्रस्थापित चौकटीला हादरे देते. भारतीय ज्ञान परंपरांची समृद्धी अधोरेखित करताना अठरापगड जमातींसह आदिवासींच्या सांस्कृतिकतेचा त्यामधील सहभाग आवर्जून नोंदवते. भारतीय स्त्रीत्व आणि सक्षमता या संदर्भात हिंदुस्थानातील विविध स्त्री - देवतांची शक्तिपीठे विचारात घेते. त्यांच्या संशोधनामुळे साहित्याचेच नाही तर समाज व संस्कृती अभ्यासाचेही दालन समृद्ध झाले आहे. त्यांचे समाजशास्त्रीय संशोधनपर लेखन कार्य अजोड आहे. तसेच ललित साहित्यही दर्जेदार आहे. काळाच्याही चार पावले पुढे जाऊन विचार करणाऱ्या उदारमतवादी लेखिकेची ओळख 'इरावती कर्वे' हा ग्रंथ पटवतो. भारतीयपणावर श्रद्धा ठेवणारा आधुनिकतेची हाक नीट लक्षात घेणारा त्यांचा द्रष्टेपणा येथे स्पष्ट होतो. विठोबाला 'बॉयफ्रेंड' असे संबोधण्याचे सामर्थ्य राखणाऱ्या या लेखिकेमध्ये दडलेले विद्रोहीपण देशी संस्कृतीचे सौंदर्य कसे टिपून देते याचे दर्शन हा ग्रंथ घडवतो.

लेखक: शोभा नाईक 
प्रकाशक: साहित्य अकादेमी 

View full details