Ja Olanduni (जा ओलांडुनी )
Ja Olanduni (जा ओलांडुनी )
Share
Author:
Publisher:
Pages: 456
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Uma Kulkarni
एखाद्या जातीला चातुर्वणर्यात बसवणं राजाच्या अधिकारात होतं. त्यासाठी आवश्यक असलेला शास्त्राचा आधार ब्राह्मण देणार! धन, सोनं, गायी देऊन ब्राह्मणाला तृप्त करून कुणीही शास्त्राला आपल्या मर्जीप्रमाणे आकार देऊ शकत होता.... बाहुबलानं जो राज्यकारभार पाहात होता तोच क्षत्रिय झाला !. जे मंत्र शिकले ते राजाच्या अनुग्रहानं ब्राह्मण-मुद्रा स्वीकारून ब्राह्मण झाले. जर सगळेच मूळ ब्राह्मण असते तर त्यामध्ये एवढे वेगवेगळे पंथ-उपपंथ का आले असते? प्रत्येक समूहानं कसल्यातरी ब्राह्मण्याचाच मुकुट मिरवला. चोरून वेदविद्या शिकून घेणाऱ्या मारम्माच्या नवऱ्यानंही हाच प्रयत्न केला होता. ब्राह्मण होण्याचा प्रयत्न ! हा सगळा इतिहास काय सांगतोय ? ब्राह्मण व्हायची इच्छा ! कुठल्या मार्गानं का होईना ब्राह्मण म्हणवून घेण्याचा प्रयत्न ! यांनी हे ब्राह्मण्य धिःक्कारलं त्यांनीही स्वतःचा एक समूह तयार करून स्वतःला श्रेष्ठ मानून तेच ब्राह्मण वेगळ्या रूपानं आपलंसं केलं... किती अदम्य आकर्षण ! किती प्रचंड शक्ती ही ! ब्रह्तत्वाची शक्ती कसली म्हणायची ? सनातन प्रश्नांचा भैरप्पांनी घेतलेला हा वेध. साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या दाटु चा मराठी अनुवाद.
या पुस्तकाचे लेखक : एस. एल. भैरप्पा, अनुवाद : उमा कुलकर्णी , प्रकाशक : साहित्य अकादेमी