Akshardhara Book Gallery
Jagavegla Adhyatma (जगावेगळं अध्यात्म)
Jagavegla Adhyatma (जगावेगळं अध्यात्म)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vimala Thakar
Publisher: Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Pages: 232
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
जगावेगळं अध्यात्म
योगावस्था हा जीवनाचा नवा आयाम a dimension of life, आणि चेतनेचा पण आयाम a dimension of consiciousness आहे. योगावस्था म्हणजे जीवनाच्या समग्रतेचा परिचय व त्याच्याशी अनुबंध साधून जगणं. जीवन जगण्याचं कर्म हीच साधना. साधना म्हणजे समग्र जीवनाचा बिनशर्त स्वीकार. जीवनाला पाठमोरं होणं हा अधर्म आहे. जीवनाचा मोठा अपराध आपण करू, जर जगण्याच्या कमवेिगळी साधना करून, सत्याचा शोध लागणार आहे आणि सत्यानुभूति होणार आहे, असं आपण समजू अगर म्हणू. शरीराचं शुद्धीकरण, वाणीचं शुद्धीकरण, मनाची संस्कारांपासून मुक्ति, यांसाठी काही मार्ग अगर प्रक्रिया सुचविणार आहांत का? मी एवढेच म्हणेन की, स्वतःचा स्वभाव, स्वतःची सहज अभिरुची ही ओळखून आपला मार्ग आपण नक्की करावा. मार्ग, प्रक्रिया माझ्यापाशी नाहीत. हातांनी, पायांनी, डोळ्यांनी अव्यक्ताला स्पर्श करता येत नाही. कोणी जर असं म्हटलं की, आईचं प्रेम कसं असतं ते आम्हाला तुम्ही तोळाभर आणून दाखवा, तर लगेच आपण म्हणाल की, 'प्रेम' असा पदार्थ नाही की जो मोजता येईल आणि चर्मचक्षूनी पाहावं असं दाखविता येईल. मनानं चिंतन करणं, मनन करणं, शब्दाच्या मदतीने विषयांचा अभ्यास करणं होऊ शकेल, मोजमाप करतां येईल. परंतु या मनानं, सर्वत्र व्याप्त अशी जी भगवंताची सत्ता आहे त्या सत्तेला अनुभवता येत नाही. आपण आपलं 'निखळ असणं' कधी पाहिलेलं नाही. व त्या असण्यामध्ये जगावं असं कुणी सांगितलेलं नाही; कारण त्या निखळ असण्यामध्ये 'जीवन' आहे व जीवनाची अपरंपार शक्ती आहे. जे जे अज्ञात किंवा अज्ञेय, अनामिकच नाही नामातीत, अरूपच नाही रूपातीत आणि गणनातीत असं जे काही जीवनाचं सत्य आहे, ते ज्ञानाच्या कक्षेत येणं शक्य नाही. कळीचा आनंद आहे उमलण्यामध्ये, फुलाचा आनंद आहे फुलण्यामध्ये, तसा आपला आनंद असावा 'जगण्यामध्ये'. पुरुषार्थासोबत जे प्रणतीचं क्षेत्र आहे, Becoming सोबत जे Being चे क्षेत्र आहे, औपाधिक अस्तित्वासोबत जी एक निरुपाधिक सत्ता आहे, तिचा बोध व्हायला हवा.
लेखक. विमला ठकार
प्रकाशक. केशव भिकाजी ढवळे ग्रंथ प्रकाशन संस्था
