Akshardhara Book Gallery
Jagdamb Jijau (॥ जगदंब जिजाऊ॥)
Jagdamb Jijau (॥ जगदंब जिजाऊ॥)
Share
Couldn't load pickup availability
Author: Indrajit Bhalerao
Publisher: Aditya Prakashan
Pages: 48
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
॥ जगदंब जिजाऊ॥
जिजाऊंच्या अद्ययावत चरित्रासह जिजाऊंची ही गौरवगीतमाला सर्वस्वी नव्या रूपात सादर करताना मला विशेष आनंद होत आहे.
परकीय मोगलांच्या गुलामीत तिनशे वर्ष जखडलेल्या मायभूमीला मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या पुत्राला जन्म देऊन त्याची तशा प्रकारे जडणजण करणारी माता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंना म्हणजे राजमाता जिजाऊंना आपण ओळखतो. मराठी भाषेत आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा पुष्कळ लिहिल्या गेल्या परंतु जिच्यामुळे शिवाजी महाराज या गौरवाला पोहोचले त्या जिजाऊंकडे मात्र मराठी गौरवगाथाकारांचे दुर्लक्ष झाल्याचे आपल्या लक्षात येईल. 'जगदंब जिजाऊ' या पुस्तकातून ही उणीव भरून काढण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
यातील काही गीत रचना नव्याने लिहिलेल्या असून आधीच्या काही गीतांचे पुनर्लेखन केलेले आहे. जिजाऊंच्या चरित्राचे देखील संपूर्णपणे पुनर्लेखन करण्यात आलेले आहे. उपलब्ध नव्या संशोधन आणि संदर्भांचा जागोजाग उपयोग करण्यात आलेला आहे. माझा हा प्रयत्न कितपत यशस्वी झालेला आहे हे शेवटी आपण मायबाप वाचकांनी ठरवायचे आहे.
लेखक : इंद्रजित भालेराव
प्रकाशक : आदित्य प्रकाशन
