Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jharokyatun.. (झरोक्यातून...)

Jharokyatun.. (झरोक्यातून...)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Jayant Vakodkar

Publisher: Anubandh Prakashan

Pages: 152

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

झरोक्यातून

भावनांचे प्रगटीकरण ही मानवाची आदिम गरज आहे. आयुष्य जगत असताना एक अवस्था अशी येते की, पाहिलेलं, अनुभवलेलं आणि मनात रुतून बसलेलं असं सगळं, अपरिहार्यपणे व्यक्त करावं वाटतं. अशा अटळ अस्वस्थतेतून जेव्हा तो पहिलावहिला सर्जनाचा अंकुर फुटतो, तो एक देवदुर्लभ क्षण असतो ! श्री. जयंत वाकोडकर यांना समाजाकडे, निसर्गाकडे आणि माणसांकडे सजग उत्सुकतेने बघण्याची एक दृष्टी लाभलेली आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेकविध अनुभवांना अभिव्यक्त करताना कधी त्यांची भावुकता दिसते, कधी कधी संवेदनशीलता जाणवते, तर कधी प्रबोधनाचे औचित्य मार्मिकपणे पकडण्याचा प्रयत्न जाणवतो. एकूणच निखळ सौंदर्यवृत्ती आणि मनःपूर्वकता त्यांच्या लेखनात जाणवते. प्रत्येक अनुभवाला ते एका निखळ भावनेने कागदावर उत्तरवतात. त्यांच्या लेखनातील वर्ण्य विषयात कधी व्यक्तिचित्रणाचा धागा दिसतो, तर कधी निसर्गाचे रंग दिसतात. कधी ते एखाद्या घटनेतून समाजहिताच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात तर कधी एखाद्या महात्म्यासमोर नतमस्तक होतात आणि मग 'झरोक्यातून' हे पुस्तक साकार होतं. पहिलंच पुस्तक असल्यामुळे त्यात नवखेपणाच्या खुणा जाणवत असल्या तरीही, मानवी जीवनाबद्दल त्यांना असणारं कुतूहल आणि समष्टीच्या कल्याणाबद्दलची त्यांची आस्था कौतुकास्पद आहे. भविष्यात त्यांच्या हातून विचारगर्भ, खोल जाणिवांचे लेखन व्हावे, त्यांचे अनुभवविश्व अधिकाधिक व्यापक होत जावे आणि त्या अनुभवांना सूक्ष्मता, साक्षेप, चिंतनशीलता असे अनेक स्तर लाभत जावेत अशा त्यांना शुभेच्छा !

लेखक. जयंत वाकोडकर 
प्रकाशक. अनुबंध प्रकाशन 

View full details