Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jhural Aani Itar Kahibahi (झुरळ आणि इतर काहीबाही)

Jhural Aani Itar Kahibahi (झुरळ आणि इतर काहीबाही)

Regular price Rs.291.60
Regular price Rs.324.00 Sale price Rs.291.60
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Pramodkumar Anerao

Publisher: Varnamudra Publishers

Pages: 135

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

झुरळ आणि इतर काहीबाही

'झुरळ आणि इतर काहीबाही' हा प्रमोदकुमार अणेराव यांचा कथासंग्रह त्याच्या शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेणारा आहे. या कथासंग्रहातील कथांची जातकुळी, तिचा बाज, तिची शैली, प्रतीकात्मकता वेगळ्या वाटेने जाणारी आहे. चाकोरी ओलांडून गेलेल्या आडव्यातिडव्या अनुभवांना भिडण्याचं धाडस त्यांची कथा करते. सामान्य माणूस ते कलावंत, त्याची कला, त्या कलेमागची तत्त्वं, भूमिका असे वेगवेगळ्या स्तरांवरील मानवी व्यवहारांचे, जगण्याचे आलेख त्यांची कथा चितारते. या कथांमधून व्यक्त होणारे माणसांचे प्रश्न वरवर पाहता साधे वाटतात, पण त्या प्रश्नांच्या मुळाशी असणाऱ्या त्यांच्या जगण्याच्या अडचणी, वेदना, व्यथा आपल्याला हलवून सोडतात, अंतर्मुख करतात. अस्वस्थता देणाऱ्या त्यांच्या एकेक कथेतून लेखक म्हणून प्रमोदकुमार अणेराव यांची संवेदनशक्ती किती तीव्र स्वरूपाची आहे, हेही त्यातून जाणवत राहते. त्यांच्या या संवेदनशीलतेला अस्तर आहे ते त्यांच्यातील चित्रकाराच्या, कवीच्या अस्सल प्रतिभेचे. कधीकधी त्यांची कथा म्हणूनच एक सजीव, बोलके 'चित्र' होऊन जाते, तर कधी काव्यात्मकतेचा प्रत्यय देणारी 'गद्य कविता'! या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या कथेला आपोआपच वेगळे परिमाण लाभते आणि स्वतंत्र अशी ओळखही प्राप्त होते. मराठी कथाविश्वाची परंपरा समृद्ध आहे. नवीन पिढीकडून वेगवेगळ्या प्रयोगशील कथा लिहिल्या जात आहेत, त्यात प्रमोदकुमार अणेराव यांची कथा उठून दिसेलच, परंतु तिच्या स्वतंत्र 'चेहऱ्यामुळे' तिला महत्त्वाचं स्थानही मिळेल असा विश्वास वाटतो!

लेखक. प्रमोदकुमार आणेराव 
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  

View full details