Akshardhara Book Gallery
Jugari (जुगारी)
Jugari (जुगारी)
Couldn't load pickup availability
Author: Dastyevaski
Share
Publisher: Continental Prakashan
Pages: 195
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Jayant Dixit
जुगारी
'जुगारी' या नावांतच प्रस्तुत कादंबरीचे रंगपैलू उलगडतात. श्रेष्ठ 'आधुनिक' कादंबरीकार फ्योदर दस्तयेवस्की (१८२१-१८८१) यांनी साधारण १८६६ च्या सुमारास म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या परिपक्व अवस्थेत लिहिलेली ही लघुकादंबरी म्हणजे थोडक्यात दस्तयेवस्कींचे आत्मकथनच म्हणता येईल. 'रूलेत' या जुगारी अड्ड्यावरील त्यांना स्वतःस आलेले हे अनुभव ! जुगार, जुगारीवृत्ती त्या अनुषंगाने १९ व्या शतकातील रशियन उमरावशाहीचा -हास-काळ, इंग्रज-फ्रेंच जर्मन, पोलिश रशियन प्रवृत्ती; त्यांचे आयुष्याविषयीचे तत्त्वज्ञान इत्यादिंचा आलेख या चित्रणाद्वारे वाचकांस पाहायला मिळेल. दस्तयेवस्कींच्या रशियन कादंबरी 'इगरोक' याचे हे भाषान्तर ! नायक 'अलेक्सिस' हा जुगारी प्रवृत्तीचा, नायिका 'पोलिना' ही पुरुषाच्या उत्कट प्रेमाची आस असलेली पण एक स्वाभिमानी स्त्री-लेखिका, सतत डावपेचाने लढणारा, भावनाशून्य-नाटकी 'ब्लांश', अत्यंत शिस्तबद्ध - हिशेबी असणाऱ्या प्रतिष्ठित आजीबाई, जनरलसाहेब, अॅस्टली या व्यक्तिरेखा 'जुगारी' वृत्तीच्या आविष्कारास अधिक उठाव आणणाऱ्या ठरतात. पेंग्विन क्लासिक्सतर्फे प्रसिद्ध झालेल्या 'The Gambler' या जेसी कूल्झन यांच्या इंग्रजी भाषांतरावरून प्रस्तुत कादंबरीचे भाषांतर श्री. जयंत दीक्षित यांनी केले आहे. ही लघुकादंबरी वाचकांना खिळवून ठेवेल हे नक्की.
लेखक. दस्तयेवस्की
अनुवादित लेखक. जयंत दीक्षित
प्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
