Akshardhara Book Gallery
Junnarche Durgavaibhav (जुन्नरचे दुर्गवैभव)
Junnarche Durgavaibhav (जुन्नरचे दुर्गवैभव)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Lahu Gaikwad, Dr. Shrikant Fulsundar
Publisher: Sanay Prakashan
Pages: 336
Edition: Latest
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक इतिहास
जुन्नरचे दुर्गवैभव
किल्ले शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. जुन्नर तालुक्यातील किल्ल्यांची शृंखला इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. ग्रामोन्नती मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नारायणगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी २०१३ पासून दुर्गसंवर्धन चळवळीत भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिरांद्वारे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गडसंवर्धन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम केले आहे. या उपक्रमांचा सविस्तर लेखाजोखा डॉ. श्रीकांत फुलसुंदर आणि डॉ. लहू गायकवाड यांनी 'जुन्नरचे दुर्गवैभव' या ग्रंथात मांडला आहे.
या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे तो राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना आणि दुर्गसंवर्धन चळवळीत योगदान देणाऱ्या श्री. मिलिंद क्षिरसागर यांना समर्पित करण्यात आला आहे. दुर्गसंवर्धन चळवळीमुळे अनेक किल्ल्यांना शासकीय अर्थसहाय्य मिळाले असून, हे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढे सुरू आहे. या उपक्रमात महाविद्यालयाचे मौलिक योगदान आहे. 'जुन्नरचे दुर्गवैभव' या ग्रंथात अप्रकाशित मोडी कागदपत्रांच्या आधारे जुन्नर तालुक्यातील किल्ल्यांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक इतिहासावर लेखकांनी अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला आहे. परिसरासाठी महाविद्यालय साधन केंद्र बनावे आणि सामाजिक बांधिलकी जपावी, या हेतूने सर्वजण कार्यरत आहेत. गुरुवर्य रा. प. सबनीस यांनी परिसर विकासाची जी सामाजिक दृष्टी दिली, ती पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा ग्रंथ वाचक, पर्यटक, दुर्गसंवर्धक, इतिहास अभ्यासक आणि संशोधकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.
लेखक : डॉ. लहू गायकवाड । डॉ. श्रीकांत फुलसुंदर
