Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

KABIR SANT SUDHARAK ANI KAVI (कबीर संत सुधारक आणि कवी)

KABIR SANT SUDHARAK ANI KAVI (कबीर संत सुधारक आणि कवी)

Regular price Rs.387.00
Regular price Rs.430.00 Sale price Rs.387.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: INDRAJIT BHALERAO

Publisher: SAM PUBLICATION

Pages: 224

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:---

कबीर संत सुधारक आणि कवी


कबीरांची कविता सहाशे वर्षांपूर्वी लिहिली गेलेली असली तरी आजही ती तुमच्या माझ्याशी संवाद करते.
कबीर आपल्या समकाळाला उपदेश करत होते, पण तो आजही तुमच्या माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. कबीरांच्या कवितेत मनाचा गोडवा आहे.
तसेच खऱ्या मनाचे प्रखर बोलही आहेत. कबीरांची कविता आजही आपणाला आश्वस्त करते आणि अस्वस्थही करते. फक्त खुल्या मनानं आपण तिला सामोरं जाण्याची गरज आहे. कबीरांच्या कवितेला सतत सहाशे वर्षे उत्कट प्रतिसाद मिळालेला आहे. कबीरांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक आहेत. त्यात जसे राजेरजवाडे आहेत तसे बनभिकारही आहेत, प्रकांड पंडित आहेत तसेच निरक्षर मजूरही आहेत, नानक, दादूसारखे धर्मसंस्थापक आहेत तसेच निधर्मीही आहेत, माणूस कालचा असो की आजचा कबीर त्याच्या मनात खोलवर जागा मिळवतात. कबीरांवर मनातून प्रेम करणारी माणसं नेहमीच आपली जातीय ओळख विसरून स्वतःला निरपेक्ष ठेवतात. ते जशी आपली जात लपवत नाहीत तसेच ते आपली जात मिरवतही नाहीत. कबीर ज्या निर्गुणी धारेचे प्रमुख संत होते, तिचं वैशिष्ट्यच हे होतं की, ती प्रखर विरोधक असली तरी ती कुठल्या जातीधर्माची विरोधक नव्हती तर जी व्यवस्था तलवारीऐवजी म्यानाला महत्त्व देत होती, त्या व्यवस्थेला या निर्गुणींचा प्रखर विरोध होता.
तुमच्या जन्मजात ओळखीपेक्षा तुमच्या कर्तृत्वाच्या स्वतंत्र ओळखीला कबीरांच्या कवितेची मान्यता आहे. त्यामुळेच इथल्या सर्व मागास समूहांनी कबीरांना आपलं मानलं तितकंच पुढारलेल्या निरपेक्ष लोकांनीही कबीरांना आपलं मानलं.

लेखक :इंद्रजीत भालेराव 
प्रकाशन : जायको प्रकाशन 

View full details