Akshardhara Book Gallery
Kadambari (कादंबरी)
Kadambari (कादंबरी)
Couldn't load pickup availability
Author: Vikram Bhagwat
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 185
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कादंबरी
दोन लेखकांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांतून ही 'कादंबरी' वाचकांसमोर उलगडत जाते. प्रशांत सावूला लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो, "ही कादंबरी दोघांनी का लिहायची? मला वाटतं एकाच घटनेकडे पाहायचे दोन दृष्टिकोन असतात. लेखक एक असतो तेव्हा तो असा आव आणतो की, मी त्या घटनेकडे दोन व्यक्तींच्या दृष्टिकोनातून पाहात, एका तटस्थ वृत्तीने लिहितो. हे किती खरं आहे? खरंच लेखक असा तटस्थ होऊ शकतो का? म्हणजे त्याच्या तटस्थपणामागे कधीकधी काही धूर्त हेतू असू शकतात. तू विचारशील..., 'धूर्त काय असतं? म्हणजे तुलना केली तर दोन्ही बाजू समान ताकदीनं खरोखर वाचकासमोर येतात का? का लेखक अंगभूत धूर्तपणा वापरून दुसरी बाजू कमालीच्या कौशल्यानं, कुणालाही जाणवणार नाही अशा पद्धतीनं जरा कमकुवत करून आपल्याला जो मेसेज कलाकृतीतून द्यायचा आहे तो वाचकाच्या माथी मारायचा प्रयत्न करतो?' ह्याची उत्तरं शोधण्याऐवजी एकच कादंबरी दोघांनी दोन दृष्टिकोनातून लिहिली तर? तर कदाचित ही गुत्थि सुटेल असं वाटलं." या विचारातून प्रशांत आणि सुलू एक कादंबरी एकत्र लिहायला सुरुवात करतात आणि एक विलक्षण आकृतिबंध आकाराला येतो. दोन कादंबऱ्या एकाच बिंदुपाशी सुरू होतात आणि शेवटी एकाच बिंदुपाशी संपतात. कदाचित मराठीत हा आकृतिबंध प्रथमच वापरला गेला असेल.
लेखक. विक्रम भागवत
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन
