Kahe meera soor kabira (कहें मीरा सूर कबीरा) By Dr. Radha Mangeshkar
Kahe meera soor kabira (कहें मीरा सूर कबीरा) By Dr. Radha Mangeshkar
Share
Author:
Publisher: Book Ganga Publications
Pages: 85
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Kahe meera soor kabira (कहें मीरा सूर कबीरा)
Author : Dr. Radha Mangeshkar
‘कहें... मीरा सूर कबीरा’ हा सांगीतिक कार्यक्रम २०१३ मध्ये अस्तित्वात आला आणि मी त्याचे कार्यक्रम/प्रयोग सुरू केले. हा विषय निवडायच्या मागचा विचार असा होता की महाराष्ट्राला आपल्या मराठी माणसांना उत्तर भारतातील संत, त्यांची भाषा, त्यांचं तत्वज्ञान यांची ओळख करून देणं. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि भारतरत्न लतादीदी यांची ह्या तिन्ही संतांवरील संगीत खूप प्रसिद्ध आहेत. हे संगीत उत्तर भारतात अधिक लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात मराठी लोकांमध्ये हे संगीत थोडं काळाच्या ओघात विस्मरणात गेलं आहे. मी हा ही प्रयत्न केला की विस्मरणात गेलेलं ते संगीत पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवावं. मला एक कल्पना सुचली की माझा कार्यक्रम ‘कहें... मीरा सूर कबीरा’ हा पुस्तकरूपात आणावा. जे मी कार्यक्रमात बोलत होते ते पुस्तकबद्ध करावं. संत मीराबाई, संत सूरदास आणि संत कबीर ह्यांचा इतिहास, त्यांची व्यक्तिमत्त्व, त्यांची भाषा, त्यांचा भक्तिभाव आणि त्यांचं तत्त्वज्ञान ह्यांची मी फक्त ओळख करून द्यायचा प्रयत्न केला आहे. मी आशा करते की हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल. - राधा मंगेशकर