Akshardhara Book Gallery
Kalandar (कलंदर )
Kalandar (कलंदर )
Share
Couldn't load pickup availability
Author: S N Pendse
Publisher: Majestic Publishing House
Pages: 448
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
कलंदर
'हत्या' कादंबरीचा 'कलंदर' हा पुढील भाग; - पण किती तरी वेगळा. 'हत्या'तील आत्मकथनाची शैलीच केवळ इथे बदलली आहे, असे नाही, तर पेंडसे यांच्या कलेने आपल्या विकासाचा पुढील टप्पा गाठला आहे. निसर्ग येथे कथेच्या भावगुणाशी एकजीव आणि म्हणून अधिक समृद्ध झाला आहे; व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य तसेच रसरशीत आहे. पण ते अधिक विविध रूपे धारण करते आहे; कथानकाची गुंफण अधिक सूक्ष्म आणि म्हणून अधिक वेधक झाली आहे. 'एल्गार', 'हद्दपार', 'गारंबीचा बापू', 'हत्या' या आपल्या पूर्वीच्या कादंबऱ्यांत पेंडसे यांनी रंगविलेले जीवनाचे चित्र अधिकाधिक सूक्ष्म व संमिश्र होत गेले आहे. 'कलंदर'मध्ये तर पाश्चात्त्य संगीतातील अनेक वाद्यांच्या स्वरमेळाची आठवण व्हावी, इतके ते संमिश्र, चढते आणि अनेक बिंदूंभोवती रुंजी घालूनही एका केंद्राकडे झेप घेणारे व अनेक पातळ्यांवर विकास पावूनदेखील एकात्म व सुसंवादी आहे.
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
