Kalanubhav Aani Kalavichar ( कलानुभव आणि कलाविचार )
Kalanubhav Aani Kalavichar ( कलानुभव आणि कलाविचार )
Share
Author:
Publisher:
Pages: 132
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Kalanubhav Aani Kalavichar ( कलानुभव आणि कलाविचार )
Author : Dr Shyamala Vanarase
‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ पासून सुरू झालेला प्रवास ‘कशासाठी? पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी...’ असे ऐकत आपण मोठे होतो. आपल्या जगाचा विस्तार हळूहळू मोठा होत जातो. नित्य नवीन गोष्टी बघत, त्यांचा अर्थ लावत आपण वाढत राहतो. मग साहित्य, कला, नाटक, चित्रकला आपल्या जीवनात प्रवेश करतात.
या सगळ्या कलांचा आस्वाद घेताना, अर्थ जाणून घेताना कधी कधी अडचणी निर्माण होतात. धर्मराजाचा रथ धरतीपासून चार अंगुळे वर चालायचा असे ऐकत आलो. तशीच कलाकृतीही वास्तवाच्या चार अंगुळे वर असते.
मग समोर आलेल्या कलाकृतीचा अर्थ काय? मला जे वाटत आहे ते बरोबर की चूक? कलाकाराने निर्माण केलेल्या कलाकृतीचा आस्वाद कसा घ्यावा? कलाकाराला जे सांगायचे आहे ते आपल्या भावार्थजीविकेसाठी काय करते?
त्यासाठी आपण अर्थाचे पूल कसे बांधायचे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, समीक्षेच्या किचकट वाटणार्या शब्दांमध्ये न अडकता, कशी शोधायची याची वाट या पुस्तकाद्वारे नक्की सापडेल!
It is Published By : Padmagandha Prakashan