Akshardhara Book Gallery
Kalaram Mandir Satyagrah (काळाराम मंदिर सत्याग्रह : विद्रोहाकडून क्रांतीकडे)
Kalaram Mandir Satyagrah (काळाराम मंदिर सत्याग्रह : विद्रोहाकडून क्रांतीकडे)
Couldn't load pickup availability
Author: Uttam Kamble
Share
Publisher: Lokvangmay Grih Prakashan
Pages: 180
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
काळाराम मंदिर सत्याग्रह : विद्रोहाकडून क्रांतीकडे
नाशिकचा काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह म्हणजे दीर्घकाळ टिकून राहिलेली आणि सामाजिक इतिहासात ठळकपणे नोंदवलेली गेलेली केवळ एक घटना नव्हे. तशी तर ती आहेच; पण त्याशिवाय सत्याग्रहपूर्व घडलेल्या अशाच प्रकारच्या अनेक घटनांची त्यावर गडद छाया आहे. तीव्र होत गेलेला संघर्ष आहे. या घटनेला समांतर आणि नंतर घडलेल्या अनेक घटनांच्या प्रेरणाही सत्याग्रहातून तयार झाल्या. सत्याग्रहाच्या निमित्ताने अस्पृश्यांनी छळवादी धर्म, देव आणि मंदिर संस्थांशी असलेले नातेच तोडून टाकले. सत्याग्रह काळातच येवल्यातील परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैश्विक धक्का देणारी घोषणा केली आणि धर्मांतराच्या दिशेने पाऊल टाकले. 'हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही' या त्यांच्या घोषणेने चित्रच बदलून टाकले. सत्याग्रह म्हणजे असे एक ऊर्जाकेंद्र बनले, ज्याने भावी लढायांना प्रेरणा दिल्या किंवा लढायांचे स्वरूप बदलले. सत्याग्रह सोडून सत्ता आणि शिक्षण संपादनाची एक मोठी लढाई सुरू झाली. जिच्यातून उद्याचा समाज बदलणार होता. सत्याग्रहातील जय-पराजय मोजण्याचे हेच एक साधन आहे. २०३० ला या सत्याग्रहाची शताब्दी सुरू होत आहे. यानिमित्ताने ही सारी सामाजिक स्पंदने समजून घ्यायला या ग्रंथामुळे मदत होणार आहे.
लेखक. उत्तम कांबळे
प्रकाशक. लोकवाङ्मय गृह प्रकाशन
