Akshardhara Book Gallery
Kalokhatil Kalokh (काळोखातील काळोख)
Kalokhatil Kalokh (काळोखातील काळोख)
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahadev More
Publisher: Mehta Publishing House
Pages: 145
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
काळोखातील काळोख
"काळोखातील काळोख' हा दीर्घकथासंग्रह वाचायलाच हवा; कारण यातील ग्रामीण भाग, त्यांची राहणी आणि त्यातील भयावह वाटावेत असे प्रसंग शहरी लोकांच्या अंगावर काटा आणणारे आहेत. दीर्घकथांच्या या संग्रहात पैसा आणि स्त्री वासना यात स्वतःवर नियंत्रण न राहिल्याने ख्यातनाम गुंड अप्पासाहेब खुनाचे पाट वाहतो आणि स्वतःच्याच खुनाचा 'चक्रव्यूह' आखतो.. यानंतर 'हेटाक समोर येतो.. शाळेतील मास्तर संस्कारांची उधळण करतो; पण त्याचा बळी जात असताना त्याच संस्कारांत वाढलेली पिढी गप्पगार होते. अशाच संस्कारांचा 'काळोखातील काळोख' आपल्याला बघायला मिळतो तो स्त्रियांच्या धंद्यातील चढाओढीत.. स्वतःचा पदर पाडणं आणि दुसऱ्यांना पाडायला शिकवणं यात प्रत्येक जण धंद्याच्या काळोखात खोल खोल जातो. वैचारिक ज्ञानाची 'येल' सगळीकडे खुंटलेलीच दिसते. 'दलित' ही फक्त एक जात आहे असे न मानता ते एक शाब्दिक शस्त्र आहे असे मानून व्यापारी आणि दलित यांच्यातील वादात स्वतःचाही आर्थिक फायदा करून घेणारे गुरुजी हे नावाचे गुरुजी आहेत हेच बरं आहे...
लेखक. महादेव मोरे
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
