Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kalya Jopastana (कळ्या जोपासताना)

Kalya Jopastana (कळ्या जोपासताना)

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Kumar Nanaware

Publisher: Bhagyashree Prakashan

Pages: 180

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कळ्या जोपासताना 
सेव्ह बेबी गर्ल 

"वैद्यकीय क्षेत्रातील वास्तव आणि सामाजिक संघर्षाचा आरसा !

प्रशासकीय यंत्रणा, कायदे आणि सामाजिक मानसिकता यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका प्रामाणिक सरकारी डॉक्टरचा अनुभवप्रवास म्हणजे 'कळ्या जोपासताना'. कोल्हापूरचे डॉ. कुमार ननावरे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून शासकीय आरोग्य व्यवस्थेतील 'काळ्या' बाजूंवर प्रकाशझोत टाकला आहे. 

या पुस्तकात काय वाचायला मिळेल?
स्त्रीभ्रूणहत्या आणि गर्भलिंग निदान: या राष्ट्रीय मोहीमा राबवताना यंत्रणेतील त्रुटी, येणारा दबाव आणि मिळणाऱ्या धमक्यांचे थरारक वास्तव, 

शासकीय अनास्था: अपुरे मनुष्यबळ आणि साधनांची कमतरता असूनही कर्तव्यपूर्तीसाठी केलेली धडपड.

असुरक्षित गर्भपात: बोगस डॉक्टरांकडून होणारे जीवघेणे प्रकार आणि त्यामागील सामाजिक परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण. 

सहकाऱ्यांमधील नाते: स्त्री-पुरुष सहकाऱ्यांच्या मैत्रीकडे पाहण्याचा समाजाचा संकुचित दृष्टीकोन आणि त्यातून उद्भवणारे मानसिक छळ.

व्यवस्था सुधारायची तर अशा अप्रकाशित बाजू समाजासमोर मांडण्याचे धाडस कोणीतरी करावे लागते. तसा प्रयत्न केल्याबद्दल लेखक व प्रकाशकांचे कौतुक!

- प्रा. डॉ. रूपा शहा 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या 

लेखक : डॉ. कुमार ननावरे 
प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन 

View full details