Akshardhara Book Gallery
KalyaMalya-Bhingolya (काळ्यामाळ्या-भिंगोळ्या)
KalyaMalya-Bhingolya (काळ्यामाळ्या-भिंगोळ्या)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 462
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय काय आहे ?
शिक्षणाच्या बाजारात फोफाट माजलेल्या आर्थिक, नैतिक आणि बौद्धिक भ्रष्टाचाराच्या वर्तमान वास्तवाचा त्रिमितिक एक्सरे. आधुनिक मराठी साहित्याच्या देशीवादी गद्य परंपरेतील महत्त्वाचा नवा आविष्कार. कादंबरीकाराच्या सामाजिक सभानतेशी एकरूप कथन- नीतिमत्ता कशी असावी याचे उत्कृष्ट उदाहरण. ग्रामीण महाराष्ट्रात समाजाच्या सर्वच स्तरावर खोल आत घुसलेली कीड, किडनी विकून जगणाऱ्या शालेय शिक्षकाच्या आणि आत्महत्यांच्या कड्याकडे ढकलल्या गेलेल्या, कोंडीत सापडलेल्याच्या नजरेतून क्षण-दर-क्षण टिपणारा ‘समक्ष’ अनुभव वृत्तांत. ‘आपण दगडं फोडलेली बरी. इथं माणसाला माणूस म्हणून काहीच कसं ऐकायला येत नाही? आपल्या या व्यवस्थेनं मातीच्या गोळ्यांचं दगड तर घडवलं नाहीत?’, विचारत, व्यवस्थेचा दगड फोडून दाखवणारी. भारतीय साहित्यात क्लासिक मानल्या गेलेल्या श्रीलाल शुक्लांच्या ‘राग दरबारी’च्या कसाची, दमदार राजकीय-वृत्तांत कादंबरी. – गणेश देवी
या पुस्तकाचे लेखक : कृष्णात खोत, प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
