Akshardhara Book Gallery
Kananche Dole (कानांचे डोळे)
Kananche Dole (कानांचे डोळे)
Couldn't load pickup availability
Author: Pravin Davane
Share
Publisher: Granthali
Pages: 63
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कानांचे डोळे
मनोरंजनाबरोबर बाल-किशोर वाचकांच्या संवेदनशिलतेचा परिपोष व्हावा अशा या कथा आहेत. उद्याचा अभिरुचीसंपन्न, कसदार वाचक आजच्या किशोरांतून घडणार आहे. केवळ कल्पनेच्या विश्वातील अद्भुतता बालवाचकांचे मनोरंजन करेल; पण बदललेले सभोवताल, आयुष्यातील अनपेक्षित पणे उभे टाकणारे संघर्ष यातूनही किशोर मन भविष्यासाठी सज्ज होत असते. अशा उत्कट भावविश्वाच्याही तरलकथा आजच्या बालकांना प्रेरणा देतील. दिव्यांग मित्राला सोबत देणारा रुचिर, भूकंपातून मैत्रिणींना वाचवणारी खुशबू, आर्थिक गरजेच्या काळात बालपणीच समंजस होणारा सुमित, कलेसाठी अपार मेहनत घेऊन जगण्याचं गाणं घडवणारा महेश असे अनेक नवे मित्र-मैत्रिणी आपल्या मुलांच्या जाणिवांचे क्षितिज विस्तारतील. 'कानांचे डोळे' हा एक किशोर कथासंग्रह आहेच; पण तो त्यांचे मानसिक पोषण करणारा वाङ्मयीन पालकही आहे. बालक, पालक व शिक्षक यांच्यासाठी हा किशोरकथांचा संग्रह म्हणजे संस्कारांचा नंदादीप ! बालवाचकांसाठी 'ग्रंथाली' सुवर्णमहोत्सवी वर्षातली खास भेट.
लेखक. प्रवीण दवणे
प्रकाशक. ग्रंथाली
