Akshardhara Book Gallery
Karamajhaf Bandhu Khand 1 (कारमाझफ बंधू खंड १)
Karamajhaf Bandhu Khand 1 (कारमाझफ बंधू खंड १)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dastyevaski
Publisher: Continental Prakashan
Pages: 506
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Bhau Dharmadhikari
कारमाझफ बंधू खंड १
'कारमाझफ बंधू' ही आधुनिक रशियन कादंबरीकार दस्तयेवस्कीची सर्वश्रेष्ठ कादंबरी मानली जाते. त्याच्या 'क्राईम अॅण्ड पनिशमेन्ट' प्रमाणेच तिची गणना विश्ववाङ्मयात अगदी निर्विवादपणे केली जाते. एका रशियन सौंदर्यवतीच्या प्रेमातील बापलेकांच्या स्पर्धेचा परिणाम म्हणून होऊ घातलेली 'पितृहत्या' घडते. परंतु कोर्टात गुन्हेगार ठरविला जाणारा मीत्त्या खरोखर खुनी नसतोच. या घटनेभोवती गुंफलेली ही प्रदीर्घ कादंबरी एका रोमांचकारी नाट्याचे विलक्षण दर्शन वाचकाला घडविते. सूत्रहीनता, नास्तिकता, ईश्वराचे अस्तित्त्व, विषयलंपटता यांचे भेडसावणारे विश्लेषण असामान्य व्यक्तिरेखांबरोबरच येथे सामोरे येते. साहित्यात लुटुपुटीचे आणि दिशाभूल करणारे मानदंड उभे केले जातात. पण जोवर 'कारमाझफ बंधू' सारख्या साहित्यकृतींचे स्मरण जागते असते तोपर्यंत गडबडून जाण्याचे कारण नसते. या अत्यंत श्रेष्ठ कादंबरीचा मराठीत साधा अनुवादही नसावा, ही दुस्सह परिस्थिती दूर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. फ्योदर मिखाईलोविच दस्तयेवस्की (इ. स. १८२१ ते १८८१) च्या अगदी तरुणपणीच त्याच्या वडिलांचा खून झाला. इंजिनिअरींगची पदवी घेतलेल्या फ्योदरला झारचा खून करण्याच्या कटात सहभागी झाल्यावरून फांशीची शिक्षा झाली. त्यातून माफी मिळाल्यावर चार वर्षे सैबेरियात सश्रम तुरुंगवास भोगल्यावर आणि सहा वर्षे सक्तीची लष्करी सेवा केल्यावर दस्तयेवस्कीने उर्वरीत आयुष्य साहित्यसेवेत वेचले. तो आपस्माराचा रुग्णही होता. दि हाऊस ऑफ दि डेड, नोट्स् फ्रॉम अंडरग्राऊंड, ईडियट, डेव्हिल्स या त्याच्या काही महान कलाकृती होत.
लेखक. दस्तयेवस्की
अनुवादित लेखक. भाऊ धर्माधिकारी
प्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
