Akshardhara Book Gallery
Karmyogi Kalam (कर्मयोगी कलाम)
Karmyogi Kalam (कर्मयोगी कलाम)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Kamlesh Soman
Publisher: Goyal Prakashan
Pages: 162
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कर्मयोगी कलाम
या पृथ्वीतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाची निर्मिती करण्यामागे त्या ईश्वराचा एक विशिष्ट हेतू असतो. विशिष्ट कार्यासाठी प्रत्येक जण इथे अवरतो. अंतर्मनातील अग्नीला पंख लाभावेत, यासाठी प्रत्येकाने पूर्ण प्रेमाने व क्षमतेने वर्तमानातील प्रत्येक क्षण आंतरिक दिव्यत्त्वाचे भान ठेवून जगले पाहिजे! इतकेच नाही तर त्या दिव्यत्त्वाच्या चिंतनासाठी आपण आत्मशोध घेत कृतीशील राहिले पाहिजे', असे प्रतिपादन करणारे दुर्दम्य आशावादी शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम ऊर्फ 'मिसाईल मॅन' ऊर्फ 'जनतेचे राष्ट्रपती' म्हणून ख्यातकीर्त आहेत. मी तर त्यांना ज्ञानवंत कर्मयोगीच म्हणतो. अब्दुल कलाम हे रामेश्वरम या धर्मक्षेत्रात एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी जन्माला आले. आपल्या तपोबलाने ते 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी सन्मानाचे मानकरी ठरले. शिक्षणासाठी त्यांना आपले गाव सोडावे लागले. कमालीचे कष्टही करावे लागले. आयुष्यभर दिवसाकाठी सतरा-अठरा तास अभ्यास-संशोधन करीत कलाम हे जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ झाले. डॉ होमी भाभा, डॉ विक्रम साराभाई यांच्या परंपरेत स्वतःचे एक वेगळे स्थान त्यांनी सन्मानाने निश्चित केले. एकूणच, विख्यात भारतीय शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच माजी राष्ट्रपती आणि प्रतिभावंत लेखक-विचारवंत अवुल पाकीर जैनुलाब्दिन ऊर्फ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन हे एखाद्या आकाशव्यापी ऊर्जेसारखे होते. त्यांची जीवनशैली आणि आयुष्यात त्यांनी आपल्या अत्यंत कष्टप्रद साधनेने साधलेला कर्मयोग भारतातीलच नव्हे, तर जगभरातील तरुणांना कमालीचा प्रेरणादायी व आदर्शवत वाटतो. त्या ज्ञानवंत कर्मयोग्याचीच ही जीवनकहाणी आहे. ---डॉ कमलेश सोमण
लेखक. डॉ. कमलेश सोमण
प्रकाशक. गोयल प्रकाशन
