Akshardhara Book Gallery
Kashi - kalya mandirache rahsya (काशी -काळ्या मंदिराचे रहस्य )
Kashi - kalya mandirache rahsya (काशी -काळ्या मंदिराचे रहस्य )
Share
Couldn't load pickup availability
Author: Vineet Bajpeyi
Publisher: Treeshadebooks
Pages: 402
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Rhujuta Karnik-Gupte
बेस्टसेलिंग 'हडप्पा ' मालिकेचा तिसरा भाग
विनीत बाजपेयी
काशी
काळ्या मंदिराचे रहस्य
इसवी सन पूर्व १६९९, आर्यावर्तातली दलदल - प्रलयाच्या महाकाय लाटा शहरांमागून शहरे गिळंकृत करत असताना, नौकेच्या आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी
अंतिम युद्ध सुरु होते. एक निर्दयी क्रूर राजा मानवजातीच्या अस्तित्वच संपवू पाहतो; आणि कलियुगाची चाहूल लागते.
२०१७, वाराणसी - भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे ती वेळ येताच, रात्रीच्या आकाशात पवित्र नक्षत्राचा उद्य झाला. एकीकडे देवाला अर्पण होणाऱ्या आहुतीचे अचानक एका भयानक राक्षस - बळीत रूपांतर होते आणि दुसरीकडे देवता एका रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या,गूढ भ्रातुसंघाचे रहस्य उलगडतो.
इसवी सन ७६२,राष्ट्रकूट साम्राज्य - पवित्र नगरीतून एक रहस्यमय पाहुणा पराक्रमी पृथ्वीवल्लभाला भेटायला येतो आणि त्याच्या हाती एक प्राचीन गुपित सोपवतो.सम्राट एका दंतकथेसमान, अशक्यप्राय मोहिमेला सुरुवात करतो.
२०१७,न्यूयॉर्क - अब्जाधीशांच्या सहाव्या पिढीतल्या वंशजाला 'बिग मॅन ' चा फोन येतो. 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' चे अधिपती आपला शेवटचा,प्राणघातक डाव टाकतात. मुंबईचे अंडरवर्ल्ड डॉन थेट सैतानाच्या दूतासोबत हातमिळवणी करतात.
भ्रातुसंघाशी होणाऱ्या निर्णायक लढाईत विद्युतचा निभाव लागेल का? युरोपमध्ये १४ व्या शतकात झालेल्या 'काळ्या मृत्यू ' मागचे भीषण सत्य काय आहे?
प्रकाश आणि अंधार ,सत आणि असत ,देव आणि राक्षस यांच्यातील अंतिम युद्ध पाहण्यासाठी नक्की वाचा.
लेखक : विनीत बाजपेयी
प्रकाशन :ट्री शेड बुक्स
