Akshardhara Book Gallery
Katha Verulchya Kailas Nirmitichi ( कथा वेरुळच्या कैलास निर्मितीची )
Katha Verulchya Kailas Nirmitichi ( कथा वेरुळच्या कैलास निर्मितीची )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 324
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कथा वेरुळच्या कैलास निर्मितीची
राष्ट्रकूट सम्राट देतीदुर्गाला वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास मंदिर निर्मितीची प्रेरणा कशी आणि कोणाकडून मिळाली असेल? कांचीपुरम, घारापुरी, बदामी, महाबलीपुरम येथील मंदिरांचा ह्या निर्मितीवर किती प्रभाव पडला असेल? केवळ हेच मंदिर 'आधी कळस मग पाया' अशा स्थापत्य रचनेच का? हे मंदिर प्रत्यक्ष घडवताना काय अडचणी आल्या असतील? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न ही कथा करते. अत्यंत मर्यादित ऐतिहासिक पुराव्यांना काल्पनिक कथानकाच्या धाग्यात ओवून कैलास मंदिर निर्मिती आणि दंतीदुर्गाची साम्राज्य निर्मिती ह्याचा घनिष्ठ संबंध ह्या कथेद्वारे उलगडला आहे. गणित, शिल्पकला, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि मॅनेजमेंट अशा अनेक विषयात प्राचीन भारतीय तज्ञांनी गाठलेली उंची वाचकांना नक्कीच अचंबित करेल. स्नेहलची ही अद्भुत निर्मिती चोखंदळ वाचकांसाठी.
या पुस्तकाचे लेखक : अभिजीत केतकर, प्रकाशक : स्नेहल प्रकाशन