Akshardhara Book Gallery
Kavi Kalpana Vilas (कवि कल्पना विलास)
Kavi Kalpana Vilas (कवि कल्पना विलास)
Couldn't load pickup availability
Author: Vilas Potnis
Share
Publisher: BookGanga Publications
Pages: 126
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कवि कल्पना विलास
'कवि कल्पना विलास' या पुस्तकातून वाचकांना अनेकविध कवितांचा संग्रह एकत्रितपणे अनुभवता येणार आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक प्रसंगांना सामोरे जात असतो, आणि त्या सर्वातून काही ना काहीतरी अनुभव गाठीशी घेऊन आपण आपलं जीवन समृद्ध करत असतो. काही प्रसंग जाता जाता घडून जातात, काही मनावर आयुष्यभरासाठी कोरले जातात. काही ओठांवर हास्य तर काही डोळ्यात पाणी ठेऊन जातात. काही प्रसंग आपल्याला नवीन दृष्टी देतात तर काही आपल्याला आयुष्याचं तत्वज्ञान शिकवून जातात. अशाच बहुरंगी अनुभवांचं कथन या कवितासंग्रहातून केलं आहे विलास पोतनीस या हरहुन्नरी कलाकारानं. कलाकार यासाठी कारण कधी कधी त्यांच्या या भावना शब्दांबरोबरच चित्रातूनही व्यक्त होतात. त्यातील काही चित्रांचाही या पुस्तकात अंतर्भाव केला आहे. या कवितांचं वैशिष्ट्य असं की या कविता अतिशय सरळ सुबोध, सरस तरीही आशयपूर्ण आहेत. विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे. क्लिष्ट शब्दातून येणारा अवजडपणा यात नाही, अलंकरणाचा खूप मोठा भपका नाही. प्रत्येकाला आपल्या वाटणाऱ्या या कविता आहेत. त्यामुळे प्रत्येकानी त्याचा आनंद घ्यावा आणि इतरांबरोबरही लुटावा.
लेखक. विलास पोतनीस
प्रकाशक. बुकगंगा पब्लिकेशन्स
