Akshardhara Book Gallery
Kayachikitsa (कायचिकित्सा)
Kayachikitsa (कायचिकित्सा)
Couldn't load pickup availability
Author: Y. G. Joshi
Share
Publisher: Indrayani Sahitya Pune
Pages: 672
Edition: Latest
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
कायचिकित्सा
CCIM ने कायचिकित्सा या विषयासाठी तयार केलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमानुसार लिहिलेला ग्रंथ.
वैद्य गो. रा. जोशी पंचनदीकर यांच्या संग्रहातील अनुभूत औषधांचा प्रयोग व गुरुवर्य मामा गोखले यांचे अचूक
निदान, रूढ औषधांच्या वापराची नवीन पद्धती, आयुर्वेदाच्या सिद्धान्ताचा नवीन दृष्टिकोनातून विचार या सर्वांचा संस्कार व त्यामुळेच आयुर्वेद शास्त्राचा प्रत्यक्षात यशस्वीपणे वापर करण्याचा लेखकाचा अनुभव या ग्रंथातून स्पष्ट होतो.
आयुर्वेदीय ग्रंथातील सर्व सूत्रांचे संकलन, वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा ऊहापोह, मतभेदांचे निराकरण व
त्यावरील काढलेले निष्कर्ष.
रोगनिदान किंवा संप्राप्ती सारख्या सैद्धांतिक विषय व प्रत्यक्ष चिकित्सा दोन्ही विषयांची सरळ, सोपी,
साधी मांडणी. ग्रंथोक्त चिकित्सेबरोबरच अनुभूत चिकित्सेचा समावेश.
प्रत्येक रोगाची आलेख रूपाने मांडलेली संप्राप्ती.
विद्यापीठाने मान्य केलेल्या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी त्या त्या रोगाचे अर्वाचीन दृष्टिकोनातून थोडक्यात
केलेले विवेचन.व्याधी व्यवच्छेद, साम्य भेद निरूपण यासारख्या प्रकरणांचा विशेष समावेश.
अनुक्त व्याधींची आयुर्वेदीय चिकित्सा याविषयीचे स्वतंत्र प्रकरण.
केवळ विद्यार्थी व अध्यापक यांनाच नव्हे तर वैद्यकीय व्यावसायिक आणि आयुर्वेद जिज्ञासूंनाही
अत्यंत उपयुक्त असा संग्राह्य ग्रंथ.
लेखक : प्रा. वैद्य. य. गो. जोशी
