Kenjalgadcha Kabja (केंजळगडचा कब्जा )
Kenjalgadcha Kabja (केंजळगडचा कब्जा )
Share
Author:
Publisher:
Pages: 240
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ह्या कादंबरीच्या वाचनात वाचक जणू 'वाचनधुंद' होतो...अशी धुंदी ही कादंबरी वाचल्या शिवाय कळणार किंवा चढणार नाही....ह्या किल्ल्याचा पूर्वेतिहास म्हणजे तो किल्ला बाराव्या शतकात पन्हाळ्याच्या भोज याने बांधला. १६४८ मधे आदिलशहाने तो घेतला. त्यानंतर, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपले किल्ले हस्तगत करण्याच्या मोहिमेत हाही किल्ला घेतला... पण तोपर्यंत सव्वीस वर्षे लागली आणि त्यांना १६७४ मध्ये तो घेता आला...त्याच मोहिमेतल्या एकंदर नाट्यावर ह्या कादंबरीचा पाया रचलेला आहे.तिथल्या 'तळ्या' जवळच्या 'केंजळाई माता' देवीच्या नावावरून घेराकेळंज, केळंजा आणि केंजळ गड अशी त्याला कालमानानुसार नावे पडली आहेत, मात्र छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी तो गड आपल्या कब्जात घेतल्यावर त्या गडाचे नाव 'मनमोहनगड' असे केले आहे. ह्या किल्ल्याच्या कब्जाच्या मसलतीच्या गुप्त बैठका पुण्यातल्या विठ्ठलवाडी मैदानात घडल्या असा त्यात उल्लेख आहे.
या पुस्तकाचे लेखक : विद्याधर वामन भिडे, प्रकाशक : वरदा प्रकाशन