Akshardhara Book Gallery
Khamang Tamang (खमंग टमंग)
Khamang Tamang (खमंग टमंग)
Couldn't load pickup availability
Author: Bhagwan Datar
Share
Publisher: Menaka Prakashan
Pages: 278
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
खमंग टमंग
खमंग टमंग' मध्ये जे काही लिहिलंय ते परिहासाच्या स्वरूपाचं आहे. थेट राजकीय नेत्यांची नावं घेऊन त्यांनी तिरकस बाण मारले आहेत. हे बाण घायाळ करणारे क्वचितच दिसतील. त्यांच्या धारदार टोकांपेक्षा त्याच्या बुडाला लागलेली रंगीत पिसं अधिक लोभस आहेत.
प्रवीण टोकेकर
'मार्मिक' म्हणावं तरी पंचाईत, नाव चोरलं म्हणणार! त्याचा 'सामना' करावा, तर डबक्यात हात घातल्यावर आपल्यावरच घाण उडणार म्हणून नको. फक्त 'बाण' लक्ष्यवेधी आहे हे लिहिते.
डॉ. प्रतिभा जोशी, पुणे
अशी गुरुकहाणी कधीच ऐकली नव्हती. एक नव्हे, तर चक्क तीन-तीन गुरुशिष्य जोड्यांची ही गुरुपौर्णिमा भारी आहे. धारदार टिपणी करतोस, पण जंखम न करणारी. मार तर आहे, पण मुका असल्याने दाखवता येणार नाही.
- राम भोगले, संभाजीनगर
व्वा! छानच. ती 'शूपर्णखा' तर मग हा 'उवद्ध' हे साहजिकच आहे. 'हल्ली मातोश्रीवर फक्त नाक कापलेल्यांनाच जॉब मिळतात!', ही शेवटच्या लायनीतली सिक्सर तर एकदम भारी.
भालचंद्र पंडित, पुणे
लेखक. भगवान दातार
प्रकाशक. मेनका प्रकाशन
