Akshardhara Book Gallery
Kinara Mala Pamarala (किनारा मला पामराला)
Kinara Mala Pamarala (किनारा मला पामराला)
Share
Couldn't load pickup availability
Author: Parag Pimple
Publisher: Bookmark Publications
Pages: 232
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
किनारा मला पामराला
१९९९ साली जेव्हा मोबाईल अगदीच बाल्यावस्थेत होते आणि गूगलमॅपचा जन्मही झालेला नव्हता, तेव्हापासून आजवरच्या मोटारसायकलवरुन केलेल्या कोकणभ्रमंतीत आलेल्या अनुभवांच्या शिदोरीतले हे काही निवडक अनुभव आहेत. ज्या वयात आयुष्याच्या दिशा शोधत होतो, त्या वयातच या कोकणभूमीने खुला मार्ग दाखवला. नुसता मार्गच दाखवला नाही, तर त्या विशाल सागरासारखा विशाल दृष्टिकोनही दिला. उंच-उंच डोंगरकड्यांनी संकटांचा सामना करण्याचं बळ दिलं. झोकून देणाऱ्या प्रपातांनी कार्याविषयीची निष्ठा शिकवली. झाडं, पशु-पक्षी यांनी रसिकता शिकवली आणि प्रत्येक भेटीत 'वानवळा' देणाऱ्या कोकणी सुहृदांनी 'जीवनक्षण' समृद्ध केले. या साऱ्यांचं ऋण कसं फेडू ? या जन्मी ऋण फिटले नाही, तर ते फेडण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागतो म्हणतात ! म्हणूनच, नकोच आहेत ते ऋण या जन्मी फिटायला. ते फेडायला मला पुनर्जन्म घ्यायचा आहे. पुन्हा, त्या पुढच्या जन्मात असंच ऋण साचवत जाईन आणि जन्मोजन्मी ते फेडत राहीन. शेवटी इतकंच म्हणेन की, आयुष्याचं जहाज कधी भरकटलंच, तर हक्काचा आणि जगताना भक्कम पाय रोवून उभं राहाण्यासाठी सर्वार्थाने साथ देणारा, याच देवभूमीने दिला आहे
लेखक. पराग पिंपळे
प्रकाशक. बुकमार्क पब्लिकेशन्स
