Akshardhara Book Gallery
Kital (किटाळ)
Kital (किटाळ)
Share
Couldn't load pickup availability
Author: Laxman Mane
Publisher: Mehta Publishing House
Pages: 246
Edition: Latest
Binding: Paperbak
Language:Marathi
Translator:
किटाळ
गोरगरीब माणसं सन्मानाने जगू-वावरू लागली, बरोबरीचा दर्जा मागू लागली, स्वयंप्रज्ञ भूमिका घेऊ लागली, सत्ता मागू लागली की त्याच्यावर कसलंतरी जीवघेणं बालंट आणून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यंतरी माझ्यावर आलेलं किटाळ हे याच प्रयत्नाचा एक भाग. वास्तविक, स्त्री-पुरुषार्च नातं किती सुंदर आणि | उत्कट ! पण काही नालायक माणसं आपल्या पुरुषी वर्चस्वासाठी बाईला पायांतल्या पायताणासारखं समजतात, तर काही स्त्रिया आपल्या बाईपणाचा वापर पुरुषाचा काटा काढण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी करतात. स्त्री-पुरुषाच्या पवित्र नात्याचा बाजार मांडतात. आपल्या स्वार्थाच्या आणि हितसंबंधांच्या आड येणाऱ्या खंबीर ध्येयवादी पुरुषाच्या विरोधात बायका उभ्या करून त्याला आयुष्यातून उठविण्याची कट-कारस्थानं केली जातात. पुरुषसत्ताक मानसिकतेतून ही सारी षड्यंत्र रचली जातात. स्त्रीमुक्तीसाठी काम करणारी मंडळीही कळत-नकळत त्यात सामील होऊन स्त्रियांचंच शोषण करू शकतात. यांतून अंतिमतः स्त्रियाही बदफैली ठरतात आणि पुरुषाच्याही खच्चीकरणाचा मार्ग प्रशस्त होतो. हे असलं काही माझ्या वाट्याला येईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं; पण ते आलं; परंतु सत्य कधी लपून राहत नाही. हेही पुढं काळाच्या ओघात सिद्ध झालं. मला आणि माझ्या कार्याला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या याच कटाची, किटाळाची आणि किटाळमुक्तीची ही कहाणी
लेखक. लक्ष्मण माने
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
