Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kon Hote Vakatak ? (कोण होते वाकाटक ?)

Kon Hote Vakatak ? (कोण होते वाकाटक ?)

Regular price Rs.0.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.0.00
100% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arvind Jamkhedkar

Publisher: Aparant Prakashan

Pages: 182

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कोण होते वाकाटक ?

डॉ. अरविंद प्रभाकर जामखेडकर यांचा जन्म दि. ६ जुलै १९३९ रोजी धुळे येथे झाला. मालेगांव येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ते पुणे येथील स. प. महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि अर्धमागधी विषय घेऊन १९५८ साली बी. ए. ही पदवी घेतली. तिथूनच पुढे १९६० साली संस्कृत आणि भाषाशास्त्र विषय घेऊन ते एम्. ए. झाले. याच काळात त्यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डेक्कन कॉलेज इत्यादी संस्थांशीही संबंध आला. त्यांनी विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव. (पद्मविभूषण) प्रा. रा. ना. दांडेकर, (पद्मविभूषण) प्रा. ह. धी. सांकलिया, पं. वा. बा. भागवत, प्रा. फान लोहँउजन द लेऊ, प्रा. ह. चु. भायाणी इत्यादी दिग्गजांकडून अनेक विषयांची तालीम घेतली. १९६६ मध्ये डेक्कन कॉलेजमधील प्रा. शां. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वसुदेवहिंडी-अ कल्चरल स्टडी या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून पीएच्. डी. मिळवली. १९७१मध्ये नेदरलँड्स शासनाची रेसिप्रोकल फेलोशिप घेऊन त्या देशात संशोधन करण्याची संधी त्यांना मिळाली. १९६६ ते १९६८ दरम्यान धुळे येथील महाविद्यालयात अर्धमागधीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करून पुढे १९७७ पर्यंत त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृति आणि पुरातत्त्व विभागात काम केले. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि संग्रहालये या संचालनालयाचे संचालक म्हणून त्यांनी १९७७ ते १९९७ अशी वीस वर्षे काम पाहिले. त्यांच्या नावावर स्वतंत्र ग्रन्थ, संपादित ग्रन्थ आणि उत्खनन अहवाल इत्यादी स्वरूपाची अकराहून अधिक पुस्तके आणि साठ पेक्षा अधिक संशोधनपर लेख जमा आहेत. मुंबईच्या अनंताचार्य इंडोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि के. जे. सोमय्या सोमय्या सेन्टर फॉर बुद्धिस्ट स्टडीज येथे मानद प्राध्यापक, सोमय्या विद्याविहाराच्या दक्षिण आणि आग्नेयआशिया विभागाचे संचालक, दि एशियाटिक सोसायटी ऑफ् मुंबई मध्ये उपाध्यक्ष, भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे अध्यक्ष, अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली असून या संस्थांशी अनेक प्रकारे ते आजही संलग्न आहेत. सध्या ते पुण्याच्या डेक्कन कॉलेज या अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष (कुलपती) म्हणून कार्यरत आहेत. प्राचीन भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान, कला आणि स्थापत्य, बृहदश्म-संस्कृती हे डॉ. जामखेडकर यांचे विशेष अभ्यासाचे विषय होत. कोण होते वाकाटक ? या प्रस्तुत ग्रन्थाद्वारे त्यांनी विदर्भात आजवर केलेल्या अनेक पुरातत्त्वीय गवेषण-उत्खननांमधून मिळालेल्या वास्तुंचे व पुरावशेषांवर संशोधन करुन हा लेखसंग्रह अपरांततर्फे वाचकांच्या भेटीसाठी आणण्यात आला आहे. प्रस्तुत लेखसंग्रहामध्ये वाकाटक आणि इतर समकालीन राजवटी यांचा परस्परांशी संबंध, या काळातील हिंदू, बौद्ध आणि जैन गुंफा, मंदिरे, मूर्तीशिल्पे, चित्रे इत्यादी विषयांवरील लेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्या त्या लेखांसोबत आवश्यक अशी अनेक छायाचित्रेही देण्यात आली आहेत. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक आणि चोखंदळ वाचक, कोण होते वाकाटक ? या पुस्तकाचे स्वागत करतील असा विश्वास आहे.

लेखक. अरविंद जामखेडकर 
प्रकाशक. अपरांत प्रकाशन   

View full details