Akshardhara Book Gallery
Krantipath (क्रांतीपथ)
Krantipath (क्रांतीपथ)
Couldn't load pickup availability
Author: Laxman Mane
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 45
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
क्रांतीपथ
या कवितासंग्रहामधील कविता सर्वच भटक्या-विमुक्तांचा निळा मोर्चा घेऊन मराठी कवितेत अवतीर्ण झाल्या आहेत. या मोर्चात वासुदेव आहे. कुडमुड्या जोशी आहे, बंजारा आहे आणि त्याचा तांडाही आहे. कोल्हाटीण आहे. मुरळी आहे. जोगतीण आहे. भावीण आहे. बोहारीण आहे. नाथपंथी आहे. पांगुळ आहे. कंजार आहे. वडार आहे. गोंदून देणारी बाई आहे. सर्वच भटक्या-विमुक्तांमधील स्त्री-पुरुष इथे आहेत. या कवितेचं लक्षणीय वैशिष्ट्य हे आहे, की या सर्वांचा भूतकाळ या कवितेत आहे. आपल्या देशाचा इतिहास, या इतिहासातील सामाजिक संघर्ष, भटक्या-विमुक्तांच्या जीवनातील सर्व स्थित्यंतरे ही कविता आपल्यापुढे मांडते. या सर्वांचा यातनांनी भरलेला वर्तमानकाळही आहे आणि या सर्वांच्या उज्ज्वल भवितव्याची निळी पहाटही आहे. सारी निळी क्षितिजे त्यांच्या मनात उगवत आहेत आणि ही सारी निळी क्षितिजे आंबेडकर नावाच्या निळ्या सूर्याला जिवाच्या आकांताने हाका घालत आहेत.
लेखक. लक्ष्मण माने
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
