Akshardhara Book Gallery
Kurnisat (कुर्निसात)
Kurnisat (कुर्निसात)
Share
Couldn't load pickup availability
Author: Suresh Dwadashiwar
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 167
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कुर्निसात
बुद्ध, सॉक्रेटिस, ख्रिस्त आणि गांधींसारख्या महापुरुषांचे माहात्म्य त्यांच्या माऊंट एव्हरेस्टएवढ्या उंचीमुळे बहुदा कळत नाही. त्यांची शिखरे खूपदा धुक्यातही दडलेली असतात. अशा वेळी त्या पर्वताच्या पायथ्याशी उभे राहून त्यांची उंची आणि आपले ठेंगणेपण समजून घेणे हाच खऱ्या शहाणपणाचा मार्ग आहे. सामान्य माणसांना आपल्याहून कमी उंचीची आणि आज्ञाधारक असणारी माणसे आवडतात. त्यांची अहंता त्यांनाच आपण जगातले सर्वोच्च असल्याचा अहंभाव प्राप्त करून देते. हा अहंभाव त्यांना विनाशाकडे नेतो. आपल्या व्यक्तित्वाचे मोजमाप आपल्याहून लहान असणाऱ्यांच्या तुलनेत न करता मोठ्यांच्या उंचीच्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. जगाच्या इतिहासाची आणि त्यात झालेल्या सगळ्या ज्ञानी महापुरुषांची हीच खरी शिकवण आहे. ती आत्मसात करणे हा माणुसकीचा धर्म आहे. त्याच भावनेतून वेळोवेळी केलेल्या लेखनाचं हे संकलन म्हणजे थोरवीला केलेला हा कुर्निसात आहे. विविध विषयांच्या अनुषंगाने सुरेश द्वादशीवार यांनी केलेली ही वैचारिक मांडणी वाचकांना समृद्ध करणारी आहे.
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
लेखक. सुरेश द्वादशीवार
