Akshardhara Book Gallery
Lakhoba Savakar ( लखोबा सावकार )
Lakhoba Savakar ( लखोबा सावकार )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'लखोबा सावकार' ही कादंबरी शोकात्म असून ती अनेक रंगानी न्हाऊन निघाली आहे. लखोबाला या कादंबरीचा नायक म्हणावं की खलनायक ? या प्रश्नाचं उत्तर समीक्षकालाही देणं कठीण व्हावं, अशी या साहित्यकृतीची रचना. चामडीच्या सोंगटीचा डाव खेळण्यात हा लखोबा भलताच पटाईत आहे. म्हणूनच 'आंधळ्याचा हात आपसूकच भलत्याच ठिकाणी विसावल्याचं' लेखकाने लखोबाबाबतचं केलेलं वर्णन अगदीच सार्थ आहे. कादंबरीत लखोबा सावकाराचा मुत्सदीपणा आहे. त्याच्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांचं शोषण आहे. गावपातळीवरचं गलिच्छ राजकारणही आहे. निवडणूक आहे. सभासदांची सहल आहे. पळवापळवी आहे. कुरघोड्या आहेत. डावपेच आहेत. डाव उलटवण्याचे प्रकारही आहेत; सोबतच दगाबाज लखोबाच्या कपटानं आणि मीनलच्या नाटकानं बाईलवेड्या तुळशीराम आणि नाथाजीचे झालेले घात अपघात आहेत. लखोबाच्या लाडक्या मुलीचं फुललेलं प्रेम प्रकरणही चित्रित करण्यात आलं आहे. वाचकांना खिळवून ठेवणारी नाट्यपूर्ण अशी सुंदर ग्रामीण वास्तववादी कादंबरी.
या पुस्तकाचे लेखक : डॉ. मोहन दिवटे, प्रकाशक : सकाळ प्रकाशन