Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Lokarangbhoomi Aani Lokavaṅahmay (लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय)

Lokarangbhoomi Aani Lokavaṅahmay (लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय)

Regular price Rs.810.00
Regular price Rs.900.00 Sale price Rs.810.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Dilip Alone

Publisher: Vijay Prakashan

Pages: 399

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय

प्रस्तुत ग्रंथाचा विषय काही नवीन नाही; पण महत्त्वपूर्ण नक्कीच आहे. कारण प्रस्तुत विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधनही झालेले आहे. तरीही लोकरंगभूमी, लोककला आणि लोकवाङ्मयाचे एकत्रित स्रोत, एका ग्रंथात संचित म्हणून सामावलेले असावे आणि त्याचा विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासह समाजाला उपयोग व्हावा, 'लोकरंगभूमी व लोकसाहित्य' या परंपरेचा नव्या पिढीला अनमोल ठेवा असावा, हे प्रयोजनही त्यामागे आहे. 'लोकवाङ्मय म्हणजे लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले जे वाङ्मय तेच होय. याचा कर्ता लोकच अर्थात अज्ञात अशी लोकसमूहातील व्यक्ती. यास्तव लोकांनी केलेले, लोकभाषेत केलेले आणि लोकांच्या परंपरेने चालत आलेले जे वाङ्मय तेच लोकवाङ्मय होय.'
दिलीप अलोणे हे केवळ लोककलावंत नाहीत, तर बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक जीवनात चौफेर अशा विविध क्षेत्रात लीलया प्रवेश करून तेथे अमिट ठसा उमटवणारे कलाप्रेमी आहेत. त्यांच्या जीवनाचा प्रेरणादायी प्रवास हा नव्या पिढीला मार्गदर्शक ठरावा, हा मुख्य उद्देश या ग्रंथनिर्मितीमागे आहे. त्या निमित्ताने विद्यार्थी व अभ्यासक यांना लोककला, लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय यांचे साधन-स्रोत उपलब्ध व्हावे, ही देखील या ग्रंथ निर्मिती मागील महत्त्वाची भूमिका आहे.

लोकलावंत डॉ. दिलीप अलोणे गौरवग्रंथ 

संपादक : डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. उन्नती चौधरी
प्रकाशक : विजय प्रकाशन 

View full details