Akshardhara Book Gallery
Lupt (लुप्त)
Lupt (लुप्त)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vikram Bhagwat
Publisher: Mihana Publications
Pages: 166
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
लुप्त
'खून' हा कायद्याला सतत सतावणारा प्रश्न आहे. खुनाला अनेक पदर असतात. एका व्यक्तीचे जगणे दुसऱ्या व्यक्तीला इतके असह्य होते की, तो दुसऱ्या व्यक्तीचा जीव घ्यायला उद्युक्त होतो. पण प्रश्न वेगळाच आहे... खून करणे आणि खुनाचा विचार डोक्यात येणे... किंवा अनेक व्यक्तींना एकाच व्यक्तीला मारावेसे वाटणे आणि त्यातील एकाच व्यक्तीने तिला मारणे ह्यात नैतिक पातळीवर काही फरक आहे का? अशा प्रश्नांचा धांडोळा 'लुप्त' कादंबरी घेते. 'लुप्त' मधील पात्रं आसपास असतात. असा प्रत्येकाचाच अनुभव असावा. साम-मुक्ती पूर्णत्व, विठू-आधार, जॉन-प्रेमाचा उत्स्फूर्त झरा आणि विश्राम-आयुष्यातील दुःख, अपराध; या सगळ्यांची सांगड म्हणजे जगणं! जे समुद्राच्या आत खोल तळाशी नेऊन सोडते. मग एकच पर्याय ! श्वास घ्या किंवा मृत्यूला सामोरे जा! प्रत्येकानं त्याला हवं ते घ्यावं. काही व्यक्ती अत्तरासारख्या असतात. उडून जातात पण सुगंध कायम दरवळतो. साम, विठू, जॉन, फादर, जॉनची आई कुठल्या न कुठल्या स्वरूपात जगत राहणार. त्यांना जगवलं हेच 'लुप्त'चं यश ! कलेशी प्रामाणिक, निग्रही 'साम' मनावर करूणेची एक रेघोटी मारून लुप्त होते !
लेखक. विक्रम भागवत
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन .
