akshardhara
Gulzar Samajun Ghetana (गुलजार समजून घेताना)
Gulzar Samajun Ghetana (गुलजार समजून घेताना)
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
त्यांचं योगदान, मनोरंजन विश्वाला समृद्ध आयाम देणं, आणि आमच्या समजेला सुबुद्ध करणं हे बहुधा साहिर नंतर गुलज़ारनं केलं. माझ्या १९८१च्या कादंबरीत मी मुंबईला मित्रांसमवेत असतानाच किस्सा लिहिला आहे “गुलज़ार का कुणास ठाऊक, मला अगम्य/अज्ञात वाटतो. त्याची प्रत्येक रचना, स्वतःचे वेगळे रंग/स्वर घेऊनच जन्मते. खरा कवी आहे तो-शायर नाही. त्याने स्वत्व पूर्ण जपलंय, कोठेही तडजोड नाही." मित्र! “पण काही ठिकाणी गुलज़ार ओळखीचा वाटतो.” – मी! “परत तेच! फक्त वाटतो, कळत नाहीच. त्याच्या रचनांचा भेद घेणं अवघड आहे." - मित्र! "तू का प्रयत्न करत नाहीस गुलज़ारला वेठीला धरायचा?' -दुसऱ्या मित्राचे मला आव्हान! मी साशंक! “बघ, प्रयत्न कर. आधी स्वतःच्या मर्यादा ओळख. गुलज़ारला समजावून घे, मग त्याची कविता आपोआप कळेल. गुलज़ार २०१९पर्यंत मोकळाच फिरत होता. हे इतके उशिराचे, फेसबुक वर त्याच्या कलाकृतींना दुरुन समजावून घेण्याचे धाडस आज दस्तावेजात सामील होतंय, तिन्ही भाषांमध्ये, गुलज़ारच्या जगभर पसरलेल्या (माझ्यासारख्या) असंख्य प्रेमींसाठी! माझ्या दृष्टीने अजूनही समजून घेणेच सुरू आहे! कदाचित त्यानंतर त्याच्या कविता समजतील.
| ISBN No. | :MAD0073 |
| Author | :Dr Nitin Deshpande |
| Binding | :Paperback |
| Pages | :136 |
| Language | :Marathi |
| Edition | :2020 |
