Akshardhara Book Gallery
Made In India (मेड इन इंडिया)
Made In India (मेड इन इंडिया)
Couldn't load pickup availability
Author: Milind Soman / Rupa P
Share
Publisher: Vishwakarma Publications
Pages: 172
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Prajakta Chitre
मेड इन इंडिया
'मी साधेपणानं जगतो, माझ्यात कुठेही सेलिब्रिटीचा अभिनिवेश नाही, याचं लोकांना आश्चर्य वाटतं आणि ते तसं मला बऱ्याचदा सांगतातही. कदाचित, मी कुठलीही उपाधी नसलेला एक माणूस म्हणून जगतो, म्हणूनही त्यांना असं वाटत असावं. मग माझ्या आयुष्यात वेगळेपण काय आहे? तर मी करत असलेल्या विविध प्रकारच्या कामांमुळे दररोज कधी न भेटलेल्या अनेक अनोळखी लोकांशी बोलत असतो. इतरांपेक्षा वेगळं, थोडं अद्भुत वाटावं असं आयुष्य जगत असतो. त्यामुळे मी माझ्या आयुष्याचा आणि इतर गोष्टींचा जरा जास्त सखोल विचार करतो, त्याबद्दल अधिक चिंतनशील असतो. या चिंतनप्रिय स्वभावामुळे मला माझी खरी ओळख अजूनही घट्ट धरून ठेवता आली आहे. सुपर मॉडेल / आयर्नमॅन / लेडीकिलर या माझ्या निर्माण झालेल्या प्रतिमेपेक्षा माझी खरी ओळख, शिवाजी पार्कला राहणारा एक साधा, मध्यमवर्गीय मराठी मुलगा ही आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.'
मूळ लेखक. मिलिंद सोमण / रूपा पै
अनुवादित लेखक. प्राजक्ता चित्रे
प्रकाशक. विश्वकर्मा पब्लिकेशन
