Akshardhara Book Gallery
Made In USA (मेड इन युएसए)
Made In USA (मेड इन युएसए)
Couldn't load pickup availability
Author: Aniruddha Naik
Share
Publisher: Janshakti Vachak Chalval
Pages: 208
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मेड इन युएसए
अजिंठा डोंगराच्या कुशीत पहुडलेलं उंडणगाव एक सुंदर निसर्गसंपन्न असे गाव. या गावच्या बालाजी मंदिरात फार पुर्वीपासुन सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत आले आहेत. साहित्य संगीत कला ग्रहण करण्याची एक मोठी रसिक परंपरा या गावाला लाभली. याच मातीत अनिरूद्ध नाईक सारख्या रसिक मित्राचा जन्म झाला. त्याचे कलात्मक भरण पोषण याच मातीत झाले. शाश्वत पर्यटनाचा अतिशय मोलाचा प्रयोग याच मातीत 'गणेशवाडी'च्या रूपाने त्याने वास्तवात आणला. त्याच्या सर्व संस्काराचे, शाश्वत पर्यटनाच्या प्रयोगाचे, कलात्मकतेचे प्रतिबिंब त्याच्या या लेखनात उमटलेले दिसून येतात. ही केवळ एक कादंबरी म्हणुन असलेली साहित्यकृती नव्हे. एका छोट्या गावाच्या भवतालचा परिसर आणि त्याच्या कवेत येणाऱ्या सर्वच वास्तवाला शब्दांत चित्रीत करण्याचा प्रामाणीक प्रयास आहे. अनिरूद्धच्या शब्दांना अनुभुतीची जोड असल्याने त्याचे महत्व जास्त अधोरेखीत होते. श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक
लेखक. अनिरुद्ध नाईक
प्रकाशक. जनशक्ती वाचक चळवळ
