Akshardhara Book Gallery
Madhyayugin Marathi Vangmayacha Itihas (मध्ययुगीन मराठी वाङमयाचा इतिहास)
Madhyayugin Marathi Vangmayacha Itihas (मध्ययुगीन मराठी वाङमयाचा इतिहास)
Share
Couldn't load pickup availability
Author: L R Nasirabadkar
Publisher: Bhashavikas Sanshodhan Sanstha
Pages: 451
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मध्ययुगीन मराठी वाङमयाचा इतिहास
ल. रा. नसिराबादकर यांच्या या पुस्तकात मध्ययुगीन काळातील मराठी वाङ्मयाचा इतिहास वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सांगितलेला आहे. महाराष्ट्र प्रदेशाची ओळख करून देण्यापासून या भूमीत निर्माण झालेल्या साहित्याचा हा धावता आढावा अतिशय वाचनीय आहे. ही ओळख एका अर्थाने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. कोणताही इतिहास हा नित्य संशोधनचा विषय असतो. त्याला साहित्याचा इतिहासही अपवाद नाही. अलीकडे इतिहास लेखनाच्या नव्या दृष्टीमुळे रूढ इतिहासातील अनेक फटी समोर येताना दिसतात. साहित्याचा इतिहास वाचताना अभ्यासकांनी अनेक प्रमाद केले आहेत, हे लक्षात येते. पर्यायाने वाङ्मय इतिहास लेखनात अनेक ग्रंथकार, प्रवाह, संप्रदाय, प्रदेश अपरिचित राहिले. साहित्याकडे बघण्याच्या विशिष्ट धारणांमुळे अनेक महत्त्वाचे ग्रंथकार दुय्यम ठरवले गेले किंवा इतिहासात त्यांना योग्य स्थान देण्यात आले नाही. अशा इतिहासाचे पुनर्लेखन करणे, ही काळाची गरज असते. त्यादृष्टीने काही एक सुरुवात म्हणून योग्य ती भर घालून नसिराबादकरांनी लिहिलेला इतिहास प्रकाशित केला जात आहे. प्रस्तुत मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य नेमकेपणा, सर्वांगीण परिचय आणि वाचनीयता हे आहे. एखाद्या ग्रंथाचा किंवा ग्रंथकाराचा परिचय कसा करून द्यावा, याचा वस्तुपाठ म्हणून नसिराबादकरांच्या या पुस्तकाकडे पाहता येईल. आपण परिचय करून देत असलेल्या ग्रंथकारांच्या रचनांचा आणि त्याच्या योगदानाचा नेमका परामार्श करून देण्याचे एक अभिनव प्रारूपच नसिराबादकरांनी विकसित केले आहे. या ग्रंथातून मराठी भाषा आणि साहित्याच्या परंपरांचा शोध घेण्यात आला आहे. या ग्रंथात नव्याने समाविष्ट केलेल्या नोंदी महत्त्वाच्या आहेत. मध्ययुगीन कालखंडातील तंजावरचे मराठी वाङ्मय, मराठी जैन साहित्य, वीरशैव संप्रदायाचे मराठी साहित्य आणि मराठी मुस्लीम साहित्य ही प्रकरणे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. जी या पुस्तकाला नवे परिमाण देणारी ठरली आहेत. हे नवे संस्करण विद्यार्थी, शिक्षकांसह सर्वांनाच आवडेल, असा विश्वास वाटतो.
लेखक. ल. रा. नसिराबादकर
प्रकाशक. भाषाविकास संशोधन संस्था
