Akshardhara Book Gallery
Maharashtratil Bauddha Leni (महाराष्ट्रातील बौद्ध लेणी)
Maharashtratil Bauddha Leni (महाराष्ट्रातील बौद्ध लेणी)
Couldn't load pickup availability
Author: Dr Suraj A Pandit
Share
Publisher: Aparant Prakashan
Pages: 224
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महाराष्ट्रातील बौद्ध लेणी
हे पुस्तक एकूण चार न्यासांमध्ये विभागलेले आहे. लयन अध्ययनाच्या संपूर्ण प्रवासातील चार टप्पे म्हणजे हे चार न्यास. पहिल्या विभागात बुद्धचरित्र, बौद्ध धर्म आणि संघ यांची तोंडओळख आहे. एकूणच बौद्ध लेण्यांचा विचार करताना याची तोंडओळख करून देणे गरजेचे वाटले. या प्रवासातील दुसरा न्यास थोडा तांत्रिक आहे. येथे लेण्यांची अध्ययन पद्धती, कालक्रम, दानकर्ते अशा काही तांत्रिक मुद्द्यांचा विचार केला आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख लेणीसमूहाची तोंडओळख करून दिली आहे. यांचे वर्णन करताना विशिष्ट भौगोलिक परिसरात पसरलेली लेणी एकत्र करून दिली आहेत. यामुळे त्यांचा परस्परांतील संबंध जाणून घेण्यासाठी तसेच पर्यटकांसाठी मार्गदर्शक म्हणून उपयोग होणार आहे. या पुस्तकाचा चौथा भाग मात्र लहानसा आहे. बौद्ध धर्माच्या अस्तानंतर मध्ययुगामध्ये या लेण्यांचे कसे पुनरुज्जीवन झाले याविषयी प्रामुख्याने येथे चर्चा केली आहे.
लेखक. डॉ. सुरज अ. पंडित
प्रकाशक. अपरांत प्रकाशन
