Akshardhara Book Gallery
MAHARASHTRATIL JATISANTHAVISHAYAK VICHAR (महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार)
MAHARASHTRATIL JATISANTHAVISHAYAK VICHAR (महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार)
Share
Couldn't load pickup availability
Author: DATTATRAY PUNDE DR,YASHAVANT SUMANT
Publisher: MIHANA PUBLICATIONS
Pages: 478
Edition: latest
Binding: paperback
Language:marathi
Translator:---
महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार
'महाराष्ट्रातील जातिसंस्थात्मक विचार' या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९८८ मध्ये प्रसिद्ध होण्याच्या काळात 'रिडल्स' विषयक वादाचे रान माजले होते. २००६ च्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी ओ.बी.सी. आरक्षणाच्या प्रश्नावरून देशभर जणू आगीचा डोंबच उसळलेला होता. अलीकडे २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये जातिसंस्थेने कमालीचे आक्रमक व भयावह रूप धारण केलेले दिसून येते. त्यातून एक असे वातावरण निर्माण झालेले आहे की आता जातिसंस्था खुद्द शासनसंस्थेलाच "डिक्टेट" (हा शब्दप्रयोग हेतुतः) करू शकतात. "आरक्षणा" साठी आणि असलेले आरक्षण टिकविण्यासाठी जातिसंस्था एकमेकांच्या ठाम विरोधातही उभ्या राहतात.
एवंच महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक परिस्थिती पूर्णतः हाताबाहेर गेलेली आहे. पुन्हा त्यांना आवर घालील, समजुतीचे चार शब्द सांगेल असे कोणी सामाजिक विचारवंत किंवा सकारात्मक जाणीव बाळगणारे कार्यकर्तेही उपलब्ध नाहीत.
म्हणूनच प्रस्तुत संपादकाने महाराष्ट्र समाजविश्वासमोर जातिविचारा-संबंधाने काही आदर्श व सकारात्मक विचार-सूत्रे उभी करण्याच्या दृष्टीने या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीत महात्मा गांधी," राष्ट्रसंत विनोबा भावे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांसंबंधीचे लेख नव्याने लिहवून घेतलेले आहेत.
पुन्हा हा ग्रंथ सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना व पुरोगामी विचारांच्या विद्वानांना उपयुक्त ठरणारा आहे; चळवळीतील कार्यकर्त्यांनाही यातून मार्गदर्शन मिळणार आहे. साहित्य, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास इत्यादी मानव्य शाखांना हा ग्रंथ संदर्भमूल्ये पुरविणाराही आहे.
लेखक : यशवंत सुमंत
प्रकाशन : मिहना पब्लिकेशन
