Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Majhi Janmathep (माझी जन्मठेप)

Majhi Janmathep (माझी जन्मठेप)

Regular price Rs.337.50
Regular price Rs.450.00 Sale price Rs.337.50
-25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher: Madhushree Publication

Pages:

Edition: Latest

Binding:

Language:Marathi

Translator:सावकरांचे वर्णन किती प्रकारे करावे ? स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता यज्ञ म्हणजे सावरकर ! सतत धुमसत असलेला तप्त ज्वालामुखी म्हणजे सावरकर ! ज्याच्या श्वासाश्वासात मातृभूमीचाच ध्यास, म्हणजेच सावरकर ! तप्त, प्रदीप्त व्यक्तिमत्त्व, असामान्य कर्तृत्व, असीम धैर्य, पराकोटीचा त्याग, ऐकणाऱ्याला चेतविणारे अमोघ वर्तृत्व, रक्तात अंगार पेटविणारे लेखन, म्हणजे सावरकर ! 'कमला', 'गोमांतक', 'रानफुले' सारखे काव्य रचणारे हळुवार मनाचे प्रतिभाशाली कवी म्हणजे सावरकर ! '१८५७ चे स्वातंत्र्यसमर', 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने', 'हिंदुपदपादशाही' सारखे ऐतिहासिक ग्रंथ लिहिणारे इतिहासकार म्हणजे सावरकर ! ' संन्यस्त खड्ग', 'उःशाप' सारखी समाजाचे प्रबोधन करणारी नाटके लिहिणारे नाटककार सावरकर ! 'काळे पाणी', 'मोपल्याचे बंड' (अर्थात मला काय त्याचे) अशा कादंबऱ्या लिहिणारे कादंबरीकार सावरकर ! विज्ञाननिष्ठ सावरकर, जातिभेद निर्मूलक सावरकर, भाषा सुधारक सावरकर, धर्मनिष्ठ सावरकर, कैद्यांना शिकविणारे शिक्षक सावरकर, विचारवंत सावरकर आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही अटक झालेले सावरकर ! (हे देशाचे दुर्दैव...!) आणि अत्यंत शांतपणे जीवनाचा त्याग करणारे सावरकर ! त्यांच्या आत्मसमर्पणाचे राजकारण करून त्यांना हिणवणारे करंटे राजकारणी, सावरकरांचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करणारे राजकारणी ज्या देशात आहेत ते देखील देशाचे दुर्दैवच ! सावरकरांनी अंदमानात व्यतीत केलेल्या एकेका दिवसाची कहाणी म्हणजेच 'माझी जन्मठेप'. हे वाचून ज्याचे रक्त सळसळणार नाही तो देशभक्त नव्हेच !

Author : Vinayak Damodar Savarkar (वि दा सावरकर)

View full details