Akshardhara Book Gallery
Manatla Saar Kahi (मनातलं सारं काही)
Manatla Saar Kahi (मनातलं सारं काही)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vijaykumar Bhoyar
Publisher: Anubandh Prakashan
Pages: 156
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मनातलं सारं काही
संगणकाशी सतत संबंध येणाऱ्या पिढीचं हे लेखन. 'संगणक' हा जगण्यातला अविभाज्य घटक असणाऱ्या या पिढीच्या मनातल्या गोष्टी समजून घेण्याचं हे पुस्तक एक उत्तम माध्यम आहे. सध्याचं त्यांचं जगणं, 'मॉल्स' आणि 'मल्टिप्लेक्स' आणि 'मेट्रोसिटी' या त्रयीत गुरफटलेलं आहे. या जगण्यात येणारा ताण, त्या ताणाचं नियोजन करताना होणारी दमछाक याबद्दल मनात होणारी विचारांची आवर्तनं इथं कागदावर साक्षात झालेली आहेत. जुनं जीवन आणि नव्या सुखसोयी यांच्या तिठ्यावर उभं राहून ते चिंतन करतात. नव्या जुन्याचा सुबक सांधा जुळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. शिक्षणामुळे नेमकं काय मिळालं; असाही प्रश्न त्यांच्या मनात कधी कधी डोकावून जातो. गावखेड्यातली मोबाईलची भाषा, टेटस ठेवणे, शेल्फी, बड्डे विश करणे ही अशीसगळी गंमत ते खेळकर भाषेत लिहितात. खेडूत इंग्रजी फार नेमक्या शब्दांमध्ये पकडलं गेलं आहे. इथे काही कथात्म ललित आहेत, काही स्मरणरंजनात्मक लेख आहेत. जगण्यातल्या लहान-लहान गोष्टी, छोटे-छोटे प्रसंग त्यांना पुन्हा-पुन्हा नव्या-जुन्याच्या काठावर उभा करतात. मामाच्या गावातल्या त्या जुन्या कडुलिंबाच्या झाडासकट अनेक गोष्टी त्यांच्या मनःतळात मुक्काम ठोकून आहेत. हे केवळ पोकळ स्मरणरंजन नसून वर्तमान जगण्यातला कोलाहल शांत करण्यासाठीचं असरदार मलम आहे. एका अर्थाने ते विरेचन आहे. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असला तरी त्यांच्या आत एक उत्तम लेखक दडलेला आहे याची साक्ष देणारं हे पुस्तक आहे.
लेखक. विजयकुमार भोयर
प्रकाशक. अनुबंध प्रकाशन
