Akshardhara Book Gallery
Manovedh ( मनोवेध )
Manovedh ( मनोवेध )
Share
Couldn't load pickup availability
Author: Achyut Godbole , Trupti Tatkar
Publisher: Krishna Publications
Pages: 254
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
मनोवेध
मानसशास्त्रीय संकल्पना भाग १
या पुस्तकातील २५ संकल्पनांचा आपल्या मनाशी, आपल्या वर्तणुकीशी आणि एकूणच आपल्या आयुष्याशी कुठे ना कुठे थेट संबंध येतो. आपल्या समूहाबद्दल अभिमान बाळगताना इतर समूहाबद्दल आपण नकारात्मकता का बाळगतो ? सामाजिक व्यवस्थेचा आफैल्या बुद्धिमत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. आपण भाषा कशी वापरतो, लहानपणापासूनच आपल्यामध्ये नैतिकता कशी आकार घेत जाते, यांबद्दल रंजक माहिती पुस्तकातील काही संकल्पना देतील. हे पुस्तक वाचत असताना आपल्या मेंदूची अद्भुत क्षमता अवाक करेल, तर कुठल्याही बाबा-बुवांच्या भविष्यकथनाला आपण कसे बळी पडतो, हे वाचताना आपलंच आपल्याला हसूही येईल. आपल्याला 'इंट्यूशन' नेमकं कुठून आणि कसं मिळतं आणि आपल्या मनात लपलेल्या मृत्यूच्या भीतीवर आपण कशी मात करतो, अशा वेगवेगळ्या संकल्पनांची रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. सामाजिक मानसशास्त्र, कॉग्निटिव्ह मानसशास्त्र, उत्क्रांती मानसशास्त्र, न्यूरोसायकॉलॉजी, व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र, सकारात्मक मानसशास्व अशा मानसशास्वाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरलेल्या या संकल्पना केवळ अभ्यासाच्याच नाही, तर एकूणच मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरतात.
प्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स
