Akshardhara Book Gallery
Marathi Laghukatha (मराठी लघुकथा)
Marathi Laghukatha (मराठी लघुकथा)
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher: National Book Trust
Pages: 237
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Marathi Laghukatha (मराठी लघुकथा)
मराठी लघुकथा ह्या संग्रहात मराठी लघुकथेचा जन्म, विकास आणि तिची वैशिष्ट्यपूर्ण परिमाणे ह्यांचा प्रत्यय देणाऱ्या सप्रसिद्ध मराठी लेखकांच्या एकोणीस कथांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे, दिवाकर कृष्णांपासून सुरू झालेल्या मराठी लघुकथेच्या ह्या प्रवाहात अनेक उपप्रवाह येऊन मिळाले आहेत. विषयवस्तु. निवेदनपद्धती, शैली यांमध्ये विविधता आलेली आहे, त्यात बदलत्या समाजजीवनाचे चित्र प्रतिबिंबित झाले आहे. मराठी रीतिरिवाज, परंपरा, मानस-जीवन ह्यांचा अनुभव ह्या लघुकथांद्वारे येतो. एवढेच नव्हें तर ती जीवनाचे अधिक भेदक सूक्ष्म प्रत्ययकारी आणि विविध पातळयांवरून दर्शन घडवितेः माणसाच्या मनाचे चित्र गोचर करते आणि माणसामाणसांतील संबंधांचे, व्यक्तिजीवन आणि समाजजीवन ह्यांच्या अनेकविध संबंधांची अर्थपूर्णता व्यक्त करते. भारतीय साहित्यात मराठी लघुकथेचे आगळे स्थान निश्चित आहे.
संपादक: भालचंद्र फडके
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया
