Akshardhara Book Gallery
Marathi Navsamiksha : Udgam Ani Vikas (मराठी नवसमीक्षा : उद्गम आणि विकास)
Marathi Navsamiksha : Udgam Ani Vikas (मराठी नवसमीक्षा : उद्गम आणि विकास)
Share
Couldn't load pickup availability
Author: Prof. Dr. H. V. Deshpande
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 368
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
मराठी नवसमीक्षा : उद्गम आणि विकास
जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट आंग्ल कवी- समीक्षक एस.टी. कोलरिज- अमेरिकन कवी - समीक्षक जे. सी. रॅन्सम त्यांचे सर्व सहकारी यांनी अँग्लो- अमेरिकन नवसमीक्षेची सैद्धांतिक उभारणी केली. त्यांचा प्रभाव वा.ल. कुलकर्णी, मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ, वसंत दावतर, गो. म. कुलकर्णी, गंगाधर पाटील, म. सु. पाटील, सुधीर रसाळ व त्यांच्या काही इतर सहकारी समीक्षकांवर पडला. या संपूर्ण प्रक्रियेचा तौलनिक अभ्यास साक्षेपाने मराठीत होणे आवश्यक होते. रूपवादाचा अतिरेकी दुराग्रह न धरता त्यातील शाश्वत संकल्पनांचे, रूपवादाच्या (Formalism) मूलभूत तत्त्वज्ञानाचे सम्यक आकलन मराठी वाचकांपर्यंत संक्रांत करणे या हेतूने प्रस्तुतचे लेखन केलेले आहे. रूपवादाची मूळ संकल्पना अँग्लो-अमेरिकन समीक्षेत कशी आली, रुजली, ती कशी विकसित झाली आणि तिचा मराठी समीक्षेवर कसा प्रभाव पडला आणि तिचा मराठी नवसमीक्षकांनी कसा स्वीकार केला ती संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट व्हावी या हेतूने हे लेखन केलेले आहे. वाङ्मयाच्या मूलभूत आठ समीक्षा घटकांच्या आधारे तौलानिक संशोधनाच्या नव्या अभिनव पद्धतीने हा अभ्यास केलेला आहे. मराठीतील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न म्हणता येईल. - एच. व्ही. देशपांडे
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
