Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Marathyanche Aarmar 1659-1818 (मराठ्यांचे आरमार १६५९-१८१८)

Marathyanche Aarmar 1659-1818 (मराठ्यांचे आरमार १६५९-१८१८)

Regular price Rs.1,080.00
Regular price Rs.1,200.00 Sale price Rs.1,080.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Anuradha Govind Kulkarni

Publisher: Murkumbi Itihas Upakram

Pages: 462

Edition: Latest

Binding: Hardcover

Language:Marathi

Translator:

Marathyanche Aarmar  1659-1818 

मराठ्यांचे आरमार
१६५९-१८१८

भारतातील पौर्वात्य राज्यकर्त्यांना नौकानयनाची परंपरा मुळातच कमी आणि जी थोडीबहुत होती तीही जास्त करून शांततापूर्ण व्यापारी नौकानयनाचीच अधिक. ती परंपरादेखील शिवकालाच्या शेकडो वर्षे पूर्वीच खंडित झालेली होती.
स्वाभाविकच छत्रपती शिवाजी महाराजांना शून्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. त्याकरिता नौका बांधण्याचे ज्ञान, भूगोलाचे ज्ञान, समुद्राचे, वाऱ्याचे व खगोलाचे ज्ञान, नाविक रणतंत्रांचे ज्ञान अशा विविध ज्ञानशाखांचे ज्ञान आवश्यक होते. यांपैकी एकएक ज्ञानशाखा आत्मसात करायला एक आयुष्यही पुरे पडत नाही. केवळ हे ज्ञान संपादन करून आरमार निर्माण झाले नसते. त्याकरिता नौका बांधण्याची, आरमाराचे सुरक्षित तळ म्हणून उपयोगी पडतील असे जलदुर्ग बांधण्याची आणि माणसे प्रशिक्षित करण्याची आवश्यकता होती. हे सर्व फार मोठ्या खर्चाचे काम होते. पण केवळ पैसा उपलब्ध करूनही भागण्यासारखे नव्हते. पोर्तुगिजांचा व सिद्दीचा विरोध असताना, मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना, जमिनीवरील युद्धांच्या सर्व गरजा भागवून, करायचा होता. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले; सभासदाच्या शब्दात सांगायचे तर “दर्यास पालण राजियांनी घातले. "
शिवकालात मराठ्यांचे आरमार प्रामुख्याने लहान नौकांचे होते. इंग्रजांशी किंवा पोर्तुगिजांशी समोरासमोरच्या सामन्यात टिकाव धरू शकेल एवढी त्या आरमाराची क्षमता नव्हती. कारण एकतर त्या आरमारातील नौका लहान होत्या आणि मराठ्यांना नाविक युद्धाचा पुरेसा अनुभव नव्हता. पण या नावांचाच वापर करून समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या या माणसांनीच इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले.
सिद्दीला मुघलांचा, आश्रय नसता तर शिवकालातच मराठ्यांनी भारताच्या किनाऱ्यावरून त्याचे उच्चाटन केले असते. पुढील काळात सिद्दीचे उच्चाटन मराठ्यांकडून झाले नाही याचे प्रमुख कारण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर उत्तर हिंदुस्थानात निर्माण झालेली प्रचंड पोकळी हे आहे. या पोकळीचा फायदा घेऊन पुन्हा कोणा इराण्यांनी किंवा अफगाणांनी तिथे येऊन बसू नये याकरिता उत्तर हिंदुस्थानात स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याला मराठ्यांच्या दृष्टीने प्राधान्य होते; सिद्धीच्या उच्चाटनाला त्यांच्या दृष्टीने गौणस्थान होते. तरीही अठराव्या शतकात मराठ्यांनी सिद्धीला निर्मूलनात ढकलून टाकले होते.
पौर्वात्यांच्या राज्यामधील जहाजांना समुद्रसंचार करण्याकरिता पोर्तुगिजांचे कार्ताझ विकत घ्यावे लागत. शिवाजी महाराजांच्या जहाजांनाही हे कार्ताझ घ्यावे लागत. पण ही परिस्थिती महाराजांच्या निधनानंतर पन्नास वर्षांच्या आत पालटली. इ. स. १७२१ च्या पूर्वीपासून पोर्तुगिजांच्या वसाहतीतील व्यापारी जहाजे आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांचा नौसेनानी कान्होजी आंग्रे यांचे कौल घेऊ लागली होती.

लेखक : डॉ. अनुराधा गोविंद कुलकर्णी

View full details